• Download App
    मोबाईलचा परिणाम होतो मेंदूच्या थेट ग्रे मॅटरवर|Mobile affects the gray matter directly in the brain

    मेंदूचा शोध व बोध : अति मोबाईल वापरण्याचा परिणाम होतो थेट मेंदूच्या ग्रे मॅटरवर

    सध्या मोठ्यांचे पाहून लहान मुलेही मोबाईल फोनच्या आहारी जात आहेत. अनेकदा पालकही मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हाती स्मार्ट फोन सोपवतात. पण मुलांच्या हाती फोन देताना त्यांच्याकडून स्मार्ट फोन काय घेतो याचा विचार करा. मेंदूतला ग्रे मॅटर म्हणजेच विचार करणारा भाग. कायम व्यसनात अडकलेल्या माणसांच्या मेंदूतल्या ग्रे मॅटरवर परिणाम होत असतो. तोच प्रकार इथंही आढळून आला आहे. किशोरवयीन व लहान मुलांमध्ये ग्रे मॅटरचा भाग संकुचित होत असलेला संशोधकांना आढळलं आहे.Mobile affects the gray matter directly in the brain

    एका संशोधनानुसार, मेंदूत घडलेल्या बदलांची चित्रं न्युरो इमेजिंग तंत्रानुसार पाहिली आणि असं दिसलं, की मेंदूतल्या ग्रे मॅटरवर बराच परिणाम होतो. जी लहान किंवा तरुण वयातली मुलं सात तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ गॅजेट्‌स वापरतात त्यांच्या निर्णयक्षमतेवर, भावनिक नियंत्रणावर परिणाम होतो. याचा थेट परिणाम माणसाच्या भावनांवर आणि संवेदनांवर होत असतो. ही गोष्ट भावनिक बुद्धिमत्तेसाठी योग्य नाही. याचा परिणाम त्या माणसाच्या एकूण भावनिक आरोग्यावर होतो.

    त्यातूनच पुढं शारीरिक आरोग्यावरही होऊ शकतो. इंटरनेट ऍडिक्शान डिसऑर्डर (आयएडी) हा आजार आता लोकांना होतो आहे. त्याकडे गंभीर लक्ष दयायला हवं. काही मुलांना, मोठ्या माणसांना सायबर रिलेशनशिप ऍडिक्शरन या नावाचा आजार होतो. अशी मुलं सर्व वेळ आभासी मित्र-मैत्रिणींशी बोलत असतात, नवनवे आभासी मित्र-मैत्रिणी गोळा करत असतात, की त्यांना खरोखरच्या मित्र-मैत्रिणींमध्ये फारसा रस उरत नाही. अशी मुलं प्रत्यक्ष गप्पा मारताना अस्वस्थ असतात.

    मोबाईल हातात घेऊन एकमेकांना त्यातलं काही दाखवत गप्पा मारणं हे नेहमी दिसणारं दृश्यअ आहे, पण त्यात अस्वस्थता नसते, फक्त मजा असते. काही वेळा प्रत्यक्ष माणसांना टाळून नेटवर गप्पा मारत बसतात, तेव्हा नक्कीच धोका आहे. मात्र, आजकाल आपल्याला घराघरांमध्ये हेच चित्र दिसतं. लहान मुलंच नाही, तर मोठी माणसंही या छोट्याशा खेळण्याला चिकटून बसलेली असतात. त्यामुळं फ्री वायफाय प्रमाणे नो मोबाईल झोन हादेखील बौद्धिक विकासासाठी भविष्यात गरजेचा ठरेल.

    Mobile affects the gray matter directly in the brain

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!