वृत्तसंस्था
पंढरपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, पंढरपुरातील सर्व अधिकृत झोपडपट्टीतील नागरिकांना ते राहात असलेल्या जागेचा सिटी सर्वे उतारा त्यांच्या नावावर करण्यात यावा, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, या व इतर मागण्यासाठी पंढरपूरातुन मनसेचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
ओबीसीचा इंपीरियल टाटा त्वरित करून कोर्टात सादर करावा. शेतकऱ्यांचे व घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करू नये, मेहतर समाजांच्या सफाई कामगारांना राहत्या जागेवर हक्काची घरे मिळावीत. पंढरपूरमध्ये एमआयडीसी मंजूर झालीच पाहिजे, महादेव कोळी समाजाचे जातीचे दाखले सुलभ पद्धतीने मिळावेत तसेच जात पडताळणीच्या जाचक अटी रद्द कराव्यात यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रोश मोर्चा पंढरपूर मधून छत्रपती शिवाजी महाराज येथून निघणार आहे.
- पंढरपूरात मनसेचा आक्रोश मोर्चा;
- विविध मागण्यांसाठी आक्रमक पावले
- पंढरपूरमध्ये एमआयडीसी मंजूर झालीच पाहिजे
- अधिकृत झोपडपट्टीधारकांना सिटी सर्वे उतारा द्या
- ओबीसीचा इंपीरियल डेटा कोर्टात सादर करावा.