विशेष प्रतिनिधी
Satish Chavan गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरण्याची इच्छा असणारे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून हकालपट्टी झाली आहे.Satish Chavan
जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी एक पत्र लिहिले होते. ‘बहुजनांचे प्रश्न सुटतील, या उद्देशाने आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी झालो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न सोडवू शकले नाही’, अशी खंत चव्हाण यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली. त्याची राष्ट्रवादीने दखल घेतली आहे.
आमदार सतीश चव्हाण संस्थाचालक असून अजितदादांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांना गंगापूरमधून निवडणूक लढवायची आहे. पण तिथे भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत. त्यामुळे युतीतून चव्हाणांना तिकीट मिळू शकत नाही. त्यामुळे चव्हाण हे शरद पवार गटात जाऊन तिकीट घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. गेली अनेक दिवस आपल्या आमदार निधीतून ते या मतदारसंघात कामे करत आहेत. गाव भेटीदेखील करत असल्याचे दिसून येत आहे.
“MLA Satish Chavan Expelled from Ajit Pawar-led NCP Faction”
महत्वाच्या बातम्या
- Sudhanshu Trivedi : सुधांशू त्रिवेदींचा विरोधकांवर ‘व्होट जिहाद’चा आरोप!
- NDA Chief Minister and : ‘NDA’च्या मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट!
- Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीची तारीख पुढे ढकलली जाणार?
- Prashant Kishor प्रशांत किशोर यांची निवडणुकीच्या राजकारणात एन्ट्री