विशेष प्रतिनिधी
सातारा : राज्याचे गृहराज्यमंत्री हे निवासस्थानापासून दुचाकी चालवत सातारा शहर पोलिस स्टेशन येथे अचानक दाखल झाले. अचानक गृहराज्यमंत्री पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच तंतरली.Minister of State for Home Affairs Desai Access to the police station
उपस्थित पोलिसांची शंभूराज देसाई यांनी झाडाझडती घेत पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
– दुचाकी चालवत पोलिस ठाण्यात दाखल
– ठाण्यात पोलिसांची घेतली झाडाझडती
– कामकाज आणि गुन्ह्याचा घेतला आढावा
– अचानक भेट दिल्याने पोलिस भांबावले
– अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच तंतरली
– कामकाजावर व्यक्त केली नाराजी