• Download App
    Milkha Sing ! तुम्ही कायमच आमचे प्रेरणास्थान ; अभिनेता फरहान अख्तरची भावूक पोस्ट..Milkha Sing! You are always our inspiration; actor Farhan Akhtar's emotional post ...

    Milkha Sing ! तुम्ही कायमच आमचे प्रेरणास्थान ; अभिनेता फरहान अख्तरची भावूक पोस्ट…

    • Milkha Sing! You are always our inspiration; actor Farhan Akhtar’s emotional post …

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई:द फ्लाईंग सिख असा लौकिक असलेले मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळे निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. देशाला सन्मान प्राप्त करून देणारा धावपटू म्हणजे मिल्खा सिंग. त्यांच्या आयुष्यावर चित्रपटही आला होता. भाग मिल्खा भाग असं या सिनेमाचं नाव होतं. यामध्ये मिल्खा सिंग यांची भूमिका अभिनेता फरहान अख्तरने साकारली. मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर अभिनेता फरहान अख्तरने एक भावूक पोस्ट लिहिली आहे आणि त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.Milkha Sing! You are always our inspiration; actor Farhan Akhtar’s emotional post …

    काय आहे फरहान अख्तरची पोस्ट?

    प्रिय मिल्खाजी.. तुमचं निधन झालं आहे या बातमीवर मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही. माझं एक मन सांगतं आहे की तुम्ही आहात. कदाचित ही माझ्यातली बळकट बाजू आहे ज्याची प्रेरणा मला तुमच्या भूमिकेतून मिळाली आहे. मी तुमच्याकडून हे शिकलो आहे की कधीही हार मानायची नाही. वास्तव हे आहे की तुम्ही कायम जिवंत असणार आहात आमच्या मनात. तुमच्यासारखा विशाल हृदय आणि विनम्र असलेला माणूस मी पाहिला नाही.

    तुम्ही तुमच्या आयुष्यात घेतलेली मेहनत, प्रामाणिकपणा आणि सच्चेपणा यामुळे एका अढळपदावर पोहचलात. पाय जमिनीवर ठेवणं तुम्ही कधीही विसरला नाहीत. तुम्ही आमच्या आयुष्यांना स्पर्श केला आहे. आमच्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान होतात आणि कायमच राहाल. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे आणि ते तसंच राहिल अबाधित. अशी पोस्ट लिहून फरहान अख्तरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    Milkha Sing! You are always our inspiration; actor Farhan Akhtar’s emotional post …

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट