Microsoft Windows 11 : मायक्रोसॉफ्टने Windows 10 ला जुलै 2015 मध्ये लॉन्च केले होते. आणि आता सहा वर्षांनंतर जून 2021 मध्ये कंपनीने Windows 11 लाँच केले आहे. Windows 11ला मायक्रोसॉफ्टने नेक्स्ट जनरेशन विंडोज म्हटले आहे. Windows 11 सोबतच पहिल्यांदा स्टार्ट मेन्यूची जागा बदलण्यात आली आहे. सध्या स्टार्ट मेनू डाव्या बाजूलाच आहे. परंतु Windows 11 मध्ये तुम्हाला मध्यभागी स्टार्ट मेनू मिळेल. Microsoft Windows 11 How To Update and Know Release Date update free or paid
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने Windows 10 ला जुलै 2015 मध्ये लॉन्च केले होते. आणि आता सहा वर्षांनंतर जून 2021 मध्ये कंपनीने Windows 11 लाँच केले आहे. Windows 11ला मायक्रोसॉफ्टने नेक्स्ट जनरेशन विंडोज म्हटले आहे. Windows 11 सोबतच पहिल्यांदा स्टार्ट मेन्यूची जागा बदलण्यात आली आहे. सध्या स्टार्ट मेनू डाव्या बाजूलाच आहे. परंतु Windows 11 मध्ये तुम्हाला मध्यभागी स्टार्ट मेनू मिळेल.
Windows 11 चा लूक बहुतांश Chrome OS आणि macOS सारखा आहे. याची थेट स्पर्धाही या दोन ऑपरेटिंग सिस्टिमशीच आहे. Windows 11 वरून तुमच्या मनातही अनेक प्रश्न असतील. जसे की Windows 11 ची अपडेट केव्हा येणार, कोणत्या व्हर्जनमध्ये याचे अपडेट फ्री मिळेल?
Windows 11 ची वैशिष्ट्ये
Windows 11 सोबत डिजाइन, इंटरफेस आणि स्टार्ट मेनूमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. विंडोज स्टार्ट साउंडमध्येही तुम्हाला बदल पाहायला मिळेल. Windows 11च्या वेलकम स्क्रीनासोबत Hi Cortana हटवण्यात आले आहे. आणि लाइव्ह टाइल्सही तुम्हाला नव्या विंडोजमध्ये दिसणार नाहीत. Windows 11 च्या डिझाइनसोबतच मायक्रोसॉफ्टची प्लानिंग macOS आणि Chrome OS ला टक्कर देण्याची आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले की, विंडोज-11 या वर्षाच्या अखेरपर्यंत नवे कम्प्युटर्स आणि इतर उपकरणांत उपलब्ध होऊ लागले. विंडोज-10 च्या युजर्सना त्यांच्या सिस्टिममध्ये याचे अपडेट मोफत उपलब्ध केले जाईल.
पहिल्यांदा बदलला स्टार्ट मेनू
नव्या विंडोजसोबतच तुम्हाला एक फ्रेश स्टार्ट मेनू मिळेल. ज्यात नव्या साउंडसह नवा इंटरफेसही असेल. विंडोजच्या कॉर्नरची डिझाइन नुकत्याच लॉन्च झालेल्या iPadOS सारखी आहे. स्टार्ट मेनूला आता मध्यभागी जागा देण्यात आली आहे. 1996 नंतर पहिल्यांदा स्टार्ट मेनू डाव्या बाजूऐवजी मध्यभागी देण्यात आलाय. अॅपची प्लेसमेंट बहुतांश macOS आणि Chrome OS सारखीच आहे. तथापि, प्लेसमेंट तुम्ही तुमच्या हिशेबाने बदलूही शकतात. स्टार्ट मेनूमध्ये तुम्हाला लाइव्ह टाइल्सही दिसणार नाहीत.
मायक्रोसॉफ्टने Windows 11 ची अधिकृत घोषणा केलेली असली तरी याच्या रिलीजची निश्चित तारीख सांगितलेली नाही. तथापि, हे या वर्षाच्या अखेरपर्यंत रिलीज होण्याची अपेक्षा आहे. पुढच्या आठवड्यात Windows 11 ला टेस्टिंगसाठी Windows इनसाइडर मेंबरसाठी उपलब्ध केले जाईल.
मोफत मिळेल का Windows 11ची अपडेट?
Windows 10 युजर्सना नव्या विंडोजची अपडेट फ्री मिळेल. याशिवाय वर्षअखेरपर्यंत लाँच होणारे सर्व कॉम्प्युटर्स विंडोज 11 सोबतच लॉन्च होतील. पूर्वी एका लीक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, विंडोज 8.1 च्या युजर्सना याची अपडेट फ्री मिळेल. Windows 7 च्या युजर्सनी जर विंडोज 10 ची लायसन्स खरेदी केली असेल तर त्यांना काही फीचर्ससह Windows 11 मध्ये अपग्रेड करण्याची संधी मिळेल.
Windows 11 अपग्रेड करण्यासाठी सिस्टिम रिक्वायरमेंट
विंडोज 11 मध्ये अपग्रेड करण्यासाठी कमीत कमी 1GHz किंवा याहून अधिक फास्ट स्पीडवाल्या प्रोसेसरची गरज आहे. याशिवाय 64 बिट प्रोसेसरचीही आवश्यकता असेल. शिवाय 4 जीबी रॅम आणि 64 जीबी किंवा त्याहून स्टोरेजची गरज असेल. यासोबतच डिस्प्लेची साइज कमीत कमी 9 इंच असली पाहिजे, ज्याचे रिझॉल्यूशन एचडी असेल.
Microsoft Windows 11 How To Update and Know Release Date update free or paid
महत्त्वाच्या बातम्या
- Reliance AGM 2021 : तीन वर्षांत 10 लाख नोकऱ्या, 15 हजार कोटींची गुंतवणूक, मुकेश अंबानींचे टॉप 10 निर्णय
- DRDO चे आणखी एक यश, सबसॉनिक क्रूज अण्वस्त्रवाहू निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
- ‘द वायर’ विरोधात एका महिन्यात दुसऱ्यांदा FIR, पवित्र कुराण पोलिसांनी नाल्यात फेकल्याचे खोटे वृत्त दिल्याने कारवाई
- अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, सोसायटीच्या चेयरमनलाच दिली जिवे मारण्याची धमकी
- नागपूरनंतर आता अनिल देशमुखांच्या मुंबई निवासस्थानीही छापेमारी, ED ची आतापर्यंत 5 ठिकाणांवर धाड