• Download App
    मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 1.12 लाखांचा बोनस, कठीण काळातही काम केल्याचे मिळाले बक्षीस । Microsoft employees will get a bonus of about 1.12 lakh, rewarded for working in difficult times

    मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 1.12 लाखांचा बोनस, कठीण काळातही काम केल्याचे बक्षीस

    Microsoft employees : जगातील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने कोरोना महामारीच्या कठीण काळात आपल्या कर्मचार्‍यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी एकरकमी 1500 डॉलर्स (अंदाजे १.१२ लाख रुपये) बोनस जाहीर केला आहे. कंपनीकडून कॉर्पोरेट उपाध्यक्ष पातळीच्या खालील सर्व कर्मचार्‍यांना कंपनीकडून 1500 डॉलरचा बोनस देण्यात येईल. हा बोनस अशा कर्मचार्‍यांनाही उपलब्ध असेल जे अर्धवेळ कर्मचारी आहेत किंवा तासिका तत्त्वावर कंपनीशी संबंधित असून 31 मार्च 2021 पूर्वी कंपनीशी जोडलेले आहेत. ‘द व्हर्ज’च्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टने जागतिक महामारीच्या या काळात कठीण आर्थिक वर्ष पूर्ण केले आहे. Microsoft employees will get a bonus of about 1.12 lakh, rewarded for working in difficult times


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जगातील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने कोरोना महामारीच्या कठीण काळात आपल्या कर्मचार्‍यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी एकरकमी 1500 डॉलर्स (अंदाजे १.१२ लाख रुपये) बोनस जाहीर केला आहे. कंपनीकडून कॉर्पोरेट उपाध्यक्ष पातळीच्या खालील सर्व कर्मचार्‍यांना कंपनीकडून 1500 डॉलरचा बोनस देण्यात येईल. हा बोनस अशा कर्मचार्‍यांनाही उपलब्ध असेल जे अर्धवेळ कर्मचारी आहेत किंवा तासिका तत्त्वावर कंपनीशी संबंधित असून 31 मार्च 2021 पूर्वी कंपनीशी जोडलेले आहेत. ‘द व्हर्ज’च्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टने जागतिक महामारीच्या या काळात कठीण आर्थिक वर्ष पूर्ण केले आहे.

    1490 कोटींचा अतिरिक्त खर्च

    मायक्रोसॉफ्टच्या चीफ पीपल ऑफिसर, कॅथलिन होगन यांनी कर्मचार्‍यांना याची घोषणा केली आहे. हा बोनस अमेरिकेतील आणि जागतिक पातळीवरील कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांना लागू होईल. तथापि, हा बोनस लिंक्डइन, गिटहब आणि झेनिमॅक्स कर्मचार्‍यांसाठी नसेल. या तिन्ही कंपन्या मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या आहेत. मायक्रोसॉफ्टकडे सध्या 1,75,508 कर्मचारी आहेत. त्यानुसार बोनसमुळे कंपनीवर 200 दशलक्ष डॉलर्स (1490 कोटी रुपये) अतिरिक्त भार पडेल. व्हर्जच्या वृत्तानुसार, ही रक्कम मायक्रोसॉफ्टच्या दोन दिवसांच्या कमाईपेक्षाही कमी आहे.

    अनेक कंपन्यांनी यापूर्वीच दिला बोनस

    महामारीशी संबंधित बोनस जाहीर करणारी मायक्रोसॉफ काही पहिली कंपनी नाही. यापूर्वी फेसबुकने गतवर्षी आपल्या 45,000 कर्मचार्‍यांना एक हजार डॉलर्सचा बोनस दिला होता. अमेझॉनने फ्रंटलाइन वर्कर्सना 300 डॉलरचा हॉलीडे बोनस दिला आहे. याशिवाय बँक ऑफ अमेरिकाने आपल्या 1.7 लाखाहून अधिक कर्मचार्‍यांना बक्षिसे दिली आहेत. यात भारतातील त्यांच्या सुमारे 24,000 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. बँक ऑफ अमेरिकाने एक लाख डॉलर्सपेक्षा कमी पॅकेज असलेल्या कर्मचार्‍यांना 750 डॉलर्सचे बक्षीस दिले होते.

    Microsoft employees will get a bonus of about 1.12 lakh, rewarded for working in difficult times

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड