Microsoft employees : जगातील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने कोरोना महामारीच्या कठीण काळात आपल्या कर्मचार्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी एकरकमी 1500 डॉलर्स (अंदाजे १.१२ लाख रुपये) बोनस जाहीर केला आहे. कंपनीकडून कॉर्पोरेट उपाध्यक्ष पातळीच्या खालील सर्व कर्मचार्यांना कंपनीकडून 1500 डॉलरचा बोनस देण्यात येईल. हा बोनस अशा कर्मचार्यांनाही उपलब्ध असेल जे अर्धवेळ कर्मचारी आहेत किंवा तासिका तत्त्वावर कंपनीशी संबंधित असून 31 मार्च 2021 पूर्वी कंपनीशी जोडलेले आहेत. ‘द व्हर्ज’च्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टने जागतिक महामारीच्या या काळात कठीण आर्थिक वर्ष पूर्ण केले आहे. Microsoft employees will get a bonus of about 1.12 lakh, rewarded for working in difficult times
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जगातील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने कोरोना महामारीच्या कठीण काळात आपल्या कर्मचार्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी एकरकमी 1500 डॉलर्स (अंदाजे १.१२ लाख रुपये) बोनस जाहीर केला आहे. कंपनीकडून कॉर्पोरेट उपाध्यक्ष पातळीच्या खालील सर्व कर्मचार्यांना कंपनीकडून 1500 डॉलरचा बोनस देण्यात येईल. हा बोनस अशा कर्मचार्यांनाही उपलब्ध असेल जे अर्धवेळ कर्मचारी आहेत किंवा तासिका तत्त्वावर कंपनीशी संबंधित असून 31 मार्च 2021 पूर्वी कंपनीशी जोडलेले आहेत. ‘द व्हर्ज’च्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टने जागतिक महामारीच्या या काळात कठीण आर्थिक वर्ष पूर्ण केले आहे.
1490 कोटींचा अतिरिक्त खर्च
मायक्रोसॉफ्टच्या चीफ पीपल ऑफिसर, कॅथलिन होगन यांनी कर्मचार्यांना याची घोषणा केली आहे. हा बोनस अमेरिकेतील आणि जागतिक पातळीवरील कंपनीच्या सर्व कर्मचार्यांना लागू होईल. तथापि, हा बोनस लिंक्डइन, गिटहब आणि झेनिमॅक्स कर्मचार्यांसाठी नसेल. या तिन्ही कंपन्या मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या आहेत. मायक्रोसॉफ्टकडे सध्या 1,75,508 कर्मचारी आहेत. त्यानुसार बोनसमुळे कंपनीवर 200 दशलक्ष डॉलर्स (1490 कोटी रुपये) अतिरिक्त भार पडेल. व्हर्जच्या वृत्तानुसार, ही रक्कम मायक्रोसॉफ्टच्या दोन दिवसांच्या कमाईपेक्षाही कमी आहे.
अनेक कंपन्यांनी यापूर्वीच दिला बोनस
महामारीशी संबंधित बोनस जाहीर करणारी मायक्रोसॉफ काही पहिली कंपनी नाही. यापूर्वी फेसबुकने गतवर्षी आपल्या 45,000 कर्मचार्यांना एक हजार डॉलर्सचा बोनस दिला होता. अमेझॉनने फ्रंटलाइन वर्कर्सना 300 डॉलरचा हॉलीडे बोनस दिला आहे. याशिवाय बँक ऑफ अमेरिकाने आपल्या 1.7 लाखाहून अधिक कर्मचार्यांना बक्षिसे दिली आहेत. यात भारतातील त्यांच्या सुमारे 24,000 कर्मचार्यांचा समावेश आहे. बँक ऑफ अमेरिकाने एक लाख डॉलर्सपेक्षा कमी पॅकेज असलेल्या कर्मचार्यांना 750 डॉलर्सचे बक्षीस दिले होते.
Microsoft employees will get a bonus of about 1.12 lakh, rewarded for working in difficult times
महत्त्वाच्या बातम्या
- Peoples Padma Awards : पद्म पुरस्कारांसाठी PM मोदींनी मागितली नावे, असाधारण काम करणाऱ्यांचा होणार सन्मान
- ATS ने अलकायदाचा कट हाणून पाडला, लखनऊसह अनेक जिल्ह्यांत साखळी स्फोट घडवण्यापूर्वी 2 दहशतवाद्यांना अटक, जिवंत प्रेशर कुकर बॉम्बही जप्त
- धक्कादायक : बंगाली अभिनेत्रीला बलात्काराच्या धमक्या, कोलकाता पोलिसांकडून गुन्हा दाखल
- पुण्यात राज ठाकरेंची पत्रकार परिषद; एकनाथ खडसेंची सीडी, मराठा- ओबीसी आरक्षण अन् महापालिका निवडणुकांवर भाष्य
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी लोकसंख्या धोरण 2021-30 ची केली घोषणा, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे!