• Download App
    MH CET Exam Date : महत्वाची बातमी! ठरलं 'या' तारखांना होणार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ; उदय सामंत यांची घोषणा MHT-CET 2021 UG/PG exam dates released, check schedule here

    MHT-CET 2021 UG/PG Exam Date : महत्वाची बातमी! ठरलं ‘या’ तारखांना होणार राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ; उदय सामंत यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी
    मुंबई : शैक्षणिक वर्ष 2021-22 यासाठीच्या CET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं.MHT-CET 2021 UG/PG exam dates released, check schedule here

    पत्रकार परिषदेतले ठळक मुद्दे

    25 हजार संगणक अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांच्या संख्या व विद्यार्थ्यांनी दिलेल्या विकल्पानुसार सेशन संख्या निश्चित करता येईल

    प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया अभ्यासक्रमनिहाय सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आठवड्यात सुरू करण्यात येईल

    बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन 4,5,6 आणि 7 ऑक्टोबर रोजी होणार आहेत.

    उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण 8 लाख 55 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी 226 केंद्रं निश्चित करण्यात आलेली आहेत. तसंच राज्याबाहेरील केंद्राच्या संख्येतही यावर्षी वाढ करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या परीक्षांसाठी 25 हजार संगणक अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांच्या संख्या आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या विकल्पानुसार सेशन संख्या निश्चित करण्यात येईल.

    ही प्रवेश परीक्षा राज्य शासनाने कोव्हिड 19 बाबत दिलेल्या जाहीर केलेल्या सूचनांच्या नियमांचे पालन करून राबवण्यात येणार आहे. तसंच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी मुंबईत लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन तिकिटासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवावं असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

    CET परीक्षेच्या तारखा पुढीलप्रमाणे

    मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिक एज्युकेशन, बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन या परीक्षा 15 सप्टेंबर 2021 ला होणार आहेत.

    मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडी या परीक्षा 16, 17, 18 सप्टेंबरला होणार आहेत.

    बॅचलर ऑफ इंजिनिअरींग/टेक्नॉलॉजी (BE/B.TECH), बॅचलर ऑफ फार्मसी, अॅग्रीकल्चर अँड अॅलाईड कोर्स या परीक्षा 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत.

    बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन अँड मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ लॉ, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा 3 ऑक्टोबरला होणार आहेत.

    बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन 4, 5, 6 आणि 7 ऑक्टोबरला होणार आहेत. बॅचलर ऑफ लॉ (3 वर्षे) 4 आणि 5 ऑक्टोबरला, बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल या परीक्षा 6 आणि 7 ऑक्टोबरला होणार आहेत. बॅचलर फाईन आर्ट 9 आणि 10 ऑक्टोबरला होणार आहेत. या परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरू होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरू करत असताना परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरू करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

    MHT-CET 2021 UG/PG exam dates released, check schedule here

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य