• Download App
    शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्यसुद्धा कमवावे लागते, ते कसे कमवाल? Mental health has to be earned like physical health, how to earn it?

    मेंदूचा शोध व बोध : शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्यसुद्धा कमवावे लागते, ते कसे कमवाल?

    आजच्या जीवनात प्रत्येकालाच ताणतणावांना सामोरे जावे लागते. करिअर कोणतेही असले, तरी तणाव हा असतोच. जितक्या वरच्या पायरीवर पोचू तेवढे ताणतणाव अधिक. त्यामुळे ताणतणावांना सामोरे जाणे आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे खूप आवश्यक वाटते. Mental health has to be earned like physical health, how to earn it?

    शारीरिक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्यसुद्धा कमवावे लागते. शारीरिक आरोग्यातल्या त्रुटी या बाहेरून समजतात. म्हणजे वजन कमी असणे, स्थूलत्व, चेहरा फिकट दिसणे, ताप येणे, सतत कसला ना कसला आजार होणे अशी बाह्य लक्षणे लगेच लक्षात येतात; पण मानसिक अस्थैर्य आणि मानसिक दोष हे वेळेवर ओळखून त्याकरता उपाय योजना कराव्या लागतात.

    करिअरमध्ये कोणताही स्वभावदोष हा प्रगतीतील मोठा अडथळा ठरू शकतो. सर्वसाधारणपणे आपल्याकडे षड्रिपू समजले जाणारे दोष म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या दोषांना ताब्यात ठेवणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे चिंता, नैराश्य, ऑब्सेसिव्ह बिहेविअर अशा मानसिक विकारांवरही वेळीच इलाज करावे लागतात. अन्यथा पुढील काळात ते गंभीर स्वरूप धारण करू शकतात.

    मानसिक स्थैर्य आणि प्रसन्नता मिळण्यासाठी, मानसिक ताणतणावांना काबूत ठेवण्यासाठी प्रत्येकाने मेडिटेशन शिकून घेणे गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासाठी ज्याप्रमाणे रोज थोडा व्यायाम नियमितपणे करणे आवश्यक असते, तसेच मानसिक स्थैर्याकरिता नियमित मेडिटेशनची सवय लावून घेणे गरजेचे असते.

    कोणत्याही पद्धतीची ध्यानधारणा किमान दहा मिनिटे केल्यास पुढील आयुष्यात त्याचे उत्तम फायदे दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर एखाद्या कलेची जोपासना करणे किंवा उत्तम छंद बाळगणे याचाही मानसिक आरोग्याला सकारात्मक फायदा होतो. दुर्दैवाने आपली शैक्षणिक पद्धती पूर्णपणे परीक्षा आणि त्यातील गुणांवर अवलंबून असते. यात आरोग्य शिक्षणावर भर दिला जात नाही.

    शाळेच्या परीक्षा, क्लासेस, मॉडेल पेपर्स, चाचणी परीक्षा यांना जेवढे महत्त्व दिले जाते, तेवढे मुलांच्या आरोग्यदायी सवयींना दिले जात नाही. आपल्या मुलाच्या करिअरबद्दल सतत दक्ष राहणाऱ्या पालकांनी इकडे लक्ष द्यायलाच पाहिजे.

    Mental health has to be earned like physical health, how to earn it?

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!