वृत्तसंस्था
मुंबई : एटीएमच्या माध्यमातून कुठेही आणि कधीही आणि २४ तास औषधे उपलब्ध होणार आहेत. देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांची ही मशीन बसवण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.Medicines will be available from ATMs; To install machines in 6,000 blocks across the country; Convenience in remote areas
देशातल्या सहा हजार ब्लॉकमध्ये औषधांचं मशीन बसवण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी या मशीनमध्ये टाकल्यानंतर औषधे तातडीने उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशमधील ATMZ या संस्थेमध्ये याचा करार झाला आहे.
केंद्र सरकारची अयूर संजिवनी केंद्र सुरु आहेत. तेथे ही औषधांची एटीएम बसवण्याच्या निर्णय घेतला आहे. गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधे आणि इतर अनेक वैद्यकीय उपकरणं आणि इतर प्रकारची औषधे या एटीएममधून मिळणार आहेत. ग्रामीण उद्योजकांना पुढील महिन्यापासून याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या एटीएममध्ये जेनेरिक औषधं ठेवण्यात येणार आहेत. या एटीएमना ई-कॉमर्स कंपन्या औषधांचा पुरवठा करणार आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन ती सुरु करण्यात येत आहेत.
Medicines will be available from ATMs; To install machines in 6,000 blocks across the country; Convenience in remote areas
महत्त्वाच्या बातम्या
- शशी थरुरना गाढव म्हटल्याबद्दल तेलंगण काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून माफी
- काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु
- India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले