• Download App
    गौरवास्पद : जम्मू काश्मीरची पहिली ‘फायटर पायलट’ माव्या सूदन हवाई दलात रुजू ; माझी लेक देशाची मुलगी बनली : माव्याच्या वडिलांची प्रतिक्रियाMavya Sudan first woman IAF fighter pilot from Jammu and Kashmir

    गौरवास्पद : जम्मू काश्मीरची पहिली ‘फायटर पायलट’ माव्या सूदन हवाई दलात रुजू ; माझी लेक देशाची मुलगी बनली : माव्याच्या वडिलांची प्रतिक्रिया

    • माव्या ही देशाची 12 वी महिला फायटर पायलट .

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू काश्मीर:  जम्मू काश्मीरसाठी हा एक गौरवाचा क्षण आहे. कारण, इथली एक 23 वर्षीय मुलगी भारतीय हवाई दलात ‘फायटर पायलट’ म्हणून रुजू झालीय. यासोबतच, माव्या सूदन ही जम्मू काश्मीरची पहिली ‘महिला फायटर पायलट’ बनली आहे .Mavya Sudan first woman IAF fighter pilot from Jammu and Kashmir

    माव्या ही दहशतवादी घटनांसाठी अनेकदा चर्चेत येणाऱ्या राजौरी इथल्या लंबेडी गावाची रहिवासी आहे. जम्मूच्या कार्मल कॉन्व्हेन्ट स्कूलमधून तिनं आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर चंदीगडमधल्या ‘डीएव्ही’मधून तिनं ‘राज्यशास्र’ विषयातून पदवी प्राप्त केली. माव्यानं गेल्या वर्षीच भारतीय हवाई दलाची प्रवेश परीक्षा पास केली होती.

    माव्या देशाची मुलगी बनली

    आपल्या मुलीनं अवकाशाला घातलेल्या गवसणीनं फ्लाईंग ऑफिसर माव्या सूदन हिचे वडील विनोद सूदन हे खूपच आनंदी आहेत. ‘आज मी खूपच आनंदी आहे. आता ती केवळ माझीच नाही तर संपूर्ण देशाची मुलगी बनलीय. एका मुलीच्या वडिलांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे’ अशी प्रतिक्रिया विनोद सूदन यांनी व्यक्त केली.
    तर, ‘माझी छाती अभिमानानं फुलून आलीय. माव्याला तिच्या मेहनतीचं फळ मिळालंय’, अशी प्रतिक्रिया माव्याची आई सुषमा सूदन यांनी व्यक्त केली.

    हैदराबादमध्ये पासिंग आऊट परेड

    हैदराबादच्या डुंडिगल हवाईदल अकादमीत शनिवार पार पडलेल्या ‘पासिंग आऊट परेड’मध्ये माव्या एकमेवर महिला फायटर पायलट ठरली. भारतीय हवाई दलात माव्याला ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून नियुक्त करण्यात आलंय. या दरम्यान वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया हेदेखील उपस्थित होते.

    2016 मध्ये बिहारच्या भावना कंठ यांना हवाईदलात पहिली फायटर पायलट महिला होण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह यादेखील फायटर पायलट म्हणून रुजू झाल्या होत्या.

    Mavya Sudan first woman IAF fighter pilot from Jammu and Kashmir

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती