वृत्तसंस्था
औरंगाबाद : कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
आज गुरुवार ( ता. २१) पोलिस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मैदानात पोलिस हुतात्मा दिनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पोलिस बॅण्ड पथकासह विविध पथकांनी कार्यक्रमात भाग घेतला. शासकीय इतमामात हा कार्यक्रम पोलिस ग्राउंडवर घेण्यात आला. कार्यक्रमात पोलिसांनी संचलन केले.
कार्यक्रमात शहरातील सर्व पोलिस ठाण्याचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता,
२०२०-२१ यावर्षी कर्तव्य बजावताना अनेक पोलिस हुतात्मा झाले होते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
-औरंगाबादमध्ये हुतात्मा पोलिसांना अभिवादन
– पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मैदानात कार्यक्रम
– पोलिस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांचे मार्गदर्शन
– पोलिस बॅण्ड पथकासह विविध पथकांचा समावेश
– पोलिसांचे आकर्षक संचलन आणि अभिवादन
– सर्व पोलिस ठाण्याचे प्रमुख, कर्मचारी यांचा सहभाग