विनायक ढेरे
पुतळ्यातले सिंह उग्र की ते शांत
वाद घालती षंढ निरर्थक
झाकण्या आपले कर्तृत्व ते काळे
सिंहांवर शांतीचे आरोप लादती
हाती नुरे आता कोणताही मुद्दा
घालण्या तो गुद्धा मोदी पाठी
मग तो आरोप सिंहांवर लादती
शेळी खरी यांच्या मनात दडली
शांतीचे ते पाठ दुबळ्यांच्या तोंडी
त्याने बसली काठी भारताच्या पाठी
पुतळ्यातले सिंह ठेवा तुम्ही शांत
खरा सिंह सज्ज झेप घेण्या
Marathi satire poem on national emblem Controversy