• Download App
    केंद्रीय मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्यांचे स्वागत ; संजय राऊत यांचा मराठी बाणा Marathi faces in the Union Cabinet Welcomes by Sanjay Raut

    केंद्रीय मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्यांचे स्वागत ; संजय राऊत यांचा मराठी बाणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया देताना मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्याचे स्वागत करून मराठी बाणा जपला आहे. Marathi faces in the Union Cabinet Welcomes by Sanjay Raut

    मंत्रिमंडळ विस्तारात प्रकाश जावडेकर त्यांच्या सारखा दिग्गज आणि हुशार मोहरा पडल्याची खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली. दुसरीकडे भाजप खासदार नारायण राणे, भरती पवार आणि कपिल पाटील यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे स्वागत केले आहे. त्यांच्या अनुभवायचा महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी आणि प्रगतीसाठी फायदा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    नारायण राणे यांच्यासारख्या मोठ्या उंचीच्या व्यक्तीला सूक्ष्म आणि लघुउद्योग खाते दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कारण नारायण राणे हे एकेकाळी राज्याचे मुख्यमंत्री होते, असे ते म्हणाले. एकूणच मंत्रिमंडळातील विस्तारात महाराष्ट्रातील खासदारांना मिळालेल्या संधीबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

    केंद्रीय मंत्र्यांकडून काय अपेक्षा असणार त्यांनी देशाचा कारभार सांभाळायचा आहे ज्या परिस्थितीमध्ये हा देश चालला आहे महागाई असेल आर्थिक विषय असतील आरोग्यविषयक आणि बेरोजगारी असेल या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे, असे ते म्हणाले.

    भारतीय जनता पार्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आभार मानले पाहिजेत.आमच्याकडून म्हणजे नारायण राणे हे शिवसेना, काँग्रेस आणि भाजप स प्रवास करून केंद्रात मंत्री झाले. कपिल पाटील आणि भारती पवार हे अगोदर राष्ट्रवादीत होते. तेथून त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मंत्रिमंडळातील जो मंत्र्यांचा पुरवठा झाला आहे तो खऱ्या अर्थाने त्यामुळे त्यांना चेहरे मिळाले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे ,नवीन मंत्र्यांना आम्ही शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले.

    • केंद्रीय मंत्रिमंडळातील मराठी चेहऱ्यांचे स्वागत
    •  प्रकाश जावडेकर यांना डच्चू, मोहरा पडला
    •  नारायण राणे यांना कमी दर्जाचे खाते दिल्याची खंत
    •  राज्य प्रगतीपथावर नेण्याचे मोठे आव्हान
    •  नवीन मंत्र्यांकडून राज्याला मोठ्या अपेक्षा
    •  शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे मंत्रिमंडळाला नवे चेहरे
    •  राणे, पवार, पाटील पूर्वाश्रमीचे शिवसेना, राष्ट्रवादीचे
    •  महागाई, बेरोजगारी रोखण्याचे मोठे आव्हान

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…