• Download App
    महाविकास आघाडीबाबत मराठा समाजाचे संशयाचे वातावरण, सरकारमध्ये एकी नसल्यानेच ही स्थिती, विनायक मेटे यांचा आरोप | The Focus India

    महाविकास आघाडीबाबत मराठा समाजाचे संशयाचे वातावरण, सरकारमध्ये एकी नसल्यानेच ही स्थिती, विनायक मेटे यांचा आरोप

    राज्यातील महाविकास आघाडीबाबत मराठा समाजाच्या मनात संशयाचे वातावरण आहे. मराठा आरक्षणाबातत सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. जर काही कमी जास्त झालं तर इतिहास माफ करणार नाही. सरकारमध्ये एकी नसल्यामुळे मराठा समाजावर अशी परिस्थिती आहे, अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीबाबत मराठा समाजाच्या मनात संशयाचे वातावरण आहे. मराठा आरक्षणाबातत सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. जर काही कमी जास्त झालं तर इतिहास माफ करणार नाही. सरकारमध्ये एकी नसल्यामुळे मराठा समाजावर अशी परिस्थिती आहे, अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली.

    maratha reservation Vinayak Mete news

    मेटे म्हणाले की, सरकार त्यांच्या अपयशाचं खापर मराठा संघटनांवर फोडू पाहत आहे. समाजाच्या हितासाठी सर्व मराठा संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. राज्य सरकार त्यांच्या अपयशाचे खापर मराठा संघटनांवर फोडू पाहत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

    maratha reservation Vinayak Mete news

    मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याच्या राज्य सरकारच्या मागणीवर घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 डिसेंबर रोजी दिले होते.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…