विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा आरक्षण आंदोलन बंद केले नाही. ते तात्पुरते थांबविले आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
पुणे दौऱ्यावर आले असताना मराठा आरक्षणाचे काय झाले ? आंदोलन थांबविले आहे का ? असे प्रश्न त्यांना विचारले असता ते बोलत होते.
- मूक आंदोलन कोल्हापूर आणि नाशिकला झाले
- शासकीय बाबींना वेळ लागतोय म्हणून वेळ दिलाय
- तात्पुरते आंदोलन थांबवले आहे, बंद केलं नाही
- जामखेड पासून जन संवाद दौरा करतोय
- गायकवाड अहवालाच्या त्रुटी राष्ट्रपतीकडे जाणार
- सारथीच काम सुरू झालंय
- रखडलेल्या नोकरीबाबत हालचाली सुरू
- १०२ घटना दुरुस्तीसाठी वटहुकूम काढावा लागेल
- ३३८ ब तून आयोग करावा लागेल
- महाराष्ट्रात फुल प्रूफ कायदा नाही का यावर चर्चा
- राज्य फक्त आता शिफारस करू शकते
- केंद्र सरकारची जबाबदारी आहे