राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुध्द मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा चंग मराठा समाजाने बांधला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी या रॅलीला सुरुवात होईल.
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरुध्द मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा चंग मराठा समाजाने बांधला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी या रॅलीला सुरुवात होईल.
Maratha Kranti Morcha aggressive against Mahavikas Aghadi
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. आरक्षणविषयक पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. मात्र, मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे.
मुंबईमध्ये सोमावरापासून (14 डिसेंबर) दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्याची तयारीही राज्य सरकारने केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यासाठी कोल्हापूरसह राज्यभरातून अनेक गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत. हिवाळी अधिवेशनादरम्यान हे आंदोलन होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Maratha Kranti Morcha aggressive against Mahavikas Aghadi
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरीम स्थगिती उठवण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. तसा अर्जही राज्य सरकारने न्यायालयात दाखल केला होता. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या मागणीवर घटनापीठासमोर सुनावणी घेतली जावी, अशी मागणी राज्य सरकारने केली होती. सरकारची ही मागणी मान्य करून पाच सदस्यीय घटनापीठासमोर मराठा आरक्षणविषयक सुनावणी सुरु आहे. पुढील सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे.