• Download App
    अनेक शेतकरी संघटना कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पुढे; कायदे रद्द न करण्याची मागणी | The Focus India

    अनेक शेतकरी संघटना कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पुढे; कायदे रद्द न करण्याची मागणी

    • हरियाणातील 116 शेतकरी संघटनांची फेडरेशन पुढे सरसावली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील सर्वच शेतकरी संघटना कृषि कायद्याच्या विरोधात नसल्याचे उघड झाले आहे. उलट शेतकरी आंदोलनाच्या दबावात येऊन नवे कृषि कायदे रद्द करू नका अशी मागणी काही शेतकरी संघटनांनी कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे केली आहे. Many farmers’ organizations came forward in support of the Agriculture Act

    हरियाणातील ११६ शेतकरी संघटनांची फेडरेशन असलेली हर किसान, प्रगतीशील किसान संघटना यांनी तोमर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, गरज पडल्यास शेतकरी संघटनांच्या सूचनांचा विचार करून कायद्यात बदल करा. परंतु, नवा कृषि कायदा रद्द करू नका. जाबच्या २० शेतकºयांच्याही नेत्यांनी केंद्र सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला.

    आंदोलन पंजाब-हरिणापुरतेच मर्यादित; देशभरातील शेतकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे अमर हबीब यांचे आवाहन

    या वेळी बोलताना केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, खासगी गुंतवणूकदारांसाठी कृषी कायद्याद्वारे दरवाजे खुले होती. या गुंतवणूकीचा शेतीतही फायदा होईल. त्याचबरोबर खासगी गुंतवणूकीमुळे खेड्यांमध्येही रोजगाराच्या संधी वाढतील. यामुळे दोन कोटींच्या कर्जावरही 3 टक्के व्याज अनुदान उपलब्ध आहे. पण आंदोलनावर ठाम असलेले हे शेतकरी नेते हे समजू शकत नाहीयत. जे आंदोलन करतील त्यांना आम्ही सामोरे जाऊ असे तोमर म्हणाले.

    Many farmers’ organizations came forward in support of the Agriculture Act

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…