• Download App
    कित्येक मोठे खर्च हे गरजेपोटी नाही, तर होतात केवळ भावनांच्या भरात |Many big expenses are not for necessities, but for emotions

    मनी मॅटर्स : कित्येक मोठे खर्च हे गरजेपोटी नाही, तर होतात केवळ भावनांच्या भरात

    आपले कित्येक मोठे खर्च हे गरजेपोटी नाही, केवळ भावनांच्या भरात होतात. नंतर त्या वस्तुंकडे, कपड्यांकडे आपण ढुंकुनही बघत नाही. जर तुम्ही ससत अशा वस्तुंची खरेदी करता ज्यांची तुम्हाला आवश्यकता नाही, तर लवकरच तुमच्यावर अशा वस्तु विकण्याची वेळ येईल ज्यांची तुम्हाला आवश्यकता आहे असे जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. उगीच बाजारात सेल लागला किंवा म्हणुन डिस्काऊंटच्या मोहापायी आपण जर अशा वस्तुही खरेदी करत असु ज्यांची आपल्याला तितकी गरज नसेल तर ही घातक सवय आहे.Many big expenses are not for necessities, but for emotions

    आपल्या खिशाला पडलेलं हे असं छिद्र आहे, ज्यातुन गळुन गेलेला पैसा आपल्याला समजतच नाही. हे आपल्याला गरीबीकडे घेऊन जातं. मग खरेदी करणं सोडुन गरीबासारखं जगावं आणि कंजुष बनुन एके दिवशी मरुन जावं का? नाही! कुठल्याही वस्तुची खरेदी करण्याआधी इच्छा आणि गरज ह्यातला फरक आपण समजुन घेतला पाहिजे.

    तुम्ही शॉपिंगच्या व्यसनाने त्रस्त असाल तर टु विक फॉर्मुला वापरा. समजा, तुम्ही तुमच्या फेव्हरेट ब्रॅंडच्या शुजची आकर्षक जाहिरात बघितली. ते पाहुन तुम्हाला नवे शुज घ्यायची तीव्र इच्छा झाली, तर दोन आठवडे थांबा, तात्काळ खरेदी करु नका. ही तात्पुरत्या भावनांची उबळ असेल तर पंधरा दिवसात ती शमुन जाईल. आकर्षण वाटेनासे होईल. सध्याचे शुज छानच आहेत, असा मनाचा कौल मिळेल.

    खरोखरच गरज असेल तर मात्र जास्त विचार न करता खरेदी करुन मोकळे व्हा व पुढे पडा. मनातल्या मनात घुसमटत राहु नका. हीच गोष्ट नवा मोबाईल, नवी गाडी, नवे कपडे, नवी साधने, मुव्ही, पार्टी, चैनीच्या गोष्टी ह्या सगळ्यांसाठी लागु पडते. माझा स्वभावच खार्चिक आहे,मला सगळे ब्रॅंडेडच लागते, आयुष्य एकदाच मिळते पैशाचा उपभोग घ्यायलाच हवा असे लंगडे समर्थन देऊन विनाकारण अनावश्यक गोष्टींवर खर्च करु नका.

    Many big expenses are not for necessities, but for emotions

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!