• Download App
    मनीष सिसोदिया : शैक्षणिक कामातला "विदेशी डंका" आणि दारू घोटाळ्यात सीबीआयच्या छापेमारीतले तथ्य!!|Manish Sisodia Foreign sting in academic work and facts of CBI raids in liquor scam

    मनीष सिसोदिया : शैक्षणिक कामातला “विदेशी डंका” आणि दारू घोटाळ्यात सीबीआयच्या छापेमारीतले तथ्य!!

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या तब्बल 20 ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. या छाप्यांमधून बरेच तपशील बाहेर येत आहेत. ते जाहीर व्हायचे आहेत. पण या छापीमारीचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीच्या नेत्या – कार्यकर्त्यांनी “निधड्या छातीने स्वागत” केले आहे.Manish Sisodia Foreign sting in academic work and facts of CBI raids in liquor scam

    अरविंद केजरीवाल यांनी पुढे जाऊन आजच्या न्युयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजचा फोटो आपल्या ट्विटर हँडल वर शेअर करत सीबीआयच्या छापीमारेत कसे तथ्य नसले याचे रसभरीत वर्णन केले आहे. आत्तापर्यंत मनीष सिसोदिया यांच्यावर सात वेळा छापेमारी झाली. परंतु, सीबीआयला काही गवसले नसल्याचा दावा केजरीवाल यांनी करून विदेशात दिल्लीच्या शिक्षणाक्रमाचा आणि कामगिरीचा डंका वाजत असताना दिल्लीत मात्र उपमुख्यमंत्र्यांवर सीबीआय छापेमारी करत आहे ही विसंगती कशी आहे पहा!!, असा “ट्विटर टाहो” फोडला आहे.



    केजरीवालांचे अर्धसत्य

    पण केजरीवाल यांच्या ट्विटमध्ये आणि टाहोमध्ये केवळ आणि केवळ अर्धसत्य दडल्याचे दिसत आहे. मूळात केजरीवाल यांनी फक्त न्यूयॉर्क टाइम्सचे फ्रंट पेज ट्विटर वर शेअर केले आहे, ज्या फ्रंट पेजवर दिल्लीतल्या कथित शैक्षणिक यशाची कहाणी अंकित आहे. प्रत्यक्षात हा सरळ सरळ पेड मजकूर अथवा जाहिरातच आहे हे स्पष्ट दिसते. पण सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी हे ट्विट केजरीवालांनी दिल्लीकरांच्या गळ्यात मारले आहे. आणखी एक बाब त्या पुढची देखील आहे, ती म्हणजे संबंधित शैक्षणिक यशाची कहाणी फक्त न्यूयॉर्क टाइम्स मध्येच छापून आलेली नाही. ती जशीच्या तशी खलीज टाइम्स मध्ये देखील छापून आली आहे आणि इथेच या तथाकथित शैक्षणिक कहाणीचे “राजकीय इंगित” दडले आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या विदेशी वर्तमानपत्रांमध्ये जेव्हा समान कहाणी छापून येते त्याला काय म्हणायचे??, हे न समजण्याइतके दिल्लीकर जनता दुधखुळी नाही.

    छापे उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित

    शिवाय एक महत्त्वाची बाबही येथे अधोरेखित केली पाहिजे, ती म्हणजे मुळातच मनीष सिसोदिया यांच्या वरचे छापे हे अजिबातच शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित नाहीत, तर त्यांचा संबंध दिल्लीच्या दारू धोरणातील घोटाळ्याशी आणि उत्पादन शुल्काशी जोडले गेला आहेत. सीबीआयचे छापे उत्पादन शुल्काशी संबंधित आहेत. त्यातल्या अनियमितेशी संबंधित आहेत. सीबीआयचे छापे पडण्याच्या दिवशी दिल्ली सरकारने संबंधित दारू धोरण मागे देखील घेतले आहे पण या सीबीआय चौकशीची परवानगी दिल्लीच्या उपराज्यपालांनी आधीच देऊन ठेवली आहे. याचा अर्थ सीबीआयचे छापे कायदेशीर दृष्ट्या वैध आहेत. मग भले अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीचे नेते – कार्यकर्ते काँग्रेस स्टाईलने दिल्लीभर आंदोलन करत असतील!! सीबीआय छाप्यांमधील कायदेशीर तथ्य आणि त्याचा विषय त्यांना नाकारता येणार नाही. शिवाय केजरीवाल यांचे अर्धसत्य देखील न्यूयॉर्क टाइम्स आणि खलीज टाइम्स या दोन विदेशी वर्तमानपत्रांमध्ये एकाच आशयाचा कंटेंट छापून आल्यानंतर उघड झाले आहे, ते वेगळंच!!

    Manish Sisodia Foreign sting in academic work and facts of CBI raids in liquor scam

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!