• Download App
    तृणमूळच्या गळतीने ममतांच्या घराण्याची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा हवेत विरली | The Focus India

    तृणमूळच्या गळतीने ममतांच्या घराण्याची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा हवेत विरली

    • ममतांच्या पक्षाची स्ट्रॅटेजी बदलली; ममतांच्या कुटुंबातील कोणाचीच मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा नसल्याचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूळ काँग्रेसला गळती लागल्याबरोबर ममता बॅनर्जींच्या पक्षाने स्ट्रॅटेजी बदलत ममतांच्या कुटुंबातील कोणाला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असे म्हणायला सुरवात केली आहे. तृणमूळचे प्रवक्ते खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ममतांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर शेकत असलेल्या घराणेशाहीचा आरोप फेटाळताना वरील स्पष्टीकरण दिले आहे.

    mamatas party changed statuary

    मूळात गृहमंत्री अमित शहांच्या कालच्या मिदनापूरच्या रॅलीत सुवेंदू अधिकारी यांच्यसकट भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदार, खासदारांनी परोक्ष अथवा अपरोक्ष अभिषेक बॅनर्जींवरच निशाणा साधला होता. अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधातील नाराजी नवी नाही. ते खासदार असले तरी दिल्लीत कमी आणि रॉयटर्स बिल्डिंगमध्ये जास्त असा त्यांचा सुपर सीएम म्हणून वावर असल्याचे अनेक नेत्यांना खटकते. ही नाराजी सुरवातीला काही नेत्यांनी ममतांच्या कानावर घातली देखील पण त्यांनी सुरवातीला दुर्लक्ष केले आणि नंतर तर त्या अभिषेक बॅनर्जींविरोधात तक्रार करणाऱ्या नेत्यांनाच खडसावयला लागल्या. यातून ही नाराजी वाढल्याचे दिसते आहे. भाजप त्या नाराजांना जवळ करणार हे उघड आहे. पण ममता आपला वारसदार ठरवताना इतर नेत्यांना दुखवत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यातून घाऊक पक्षांतर घडते आहे आणि त्याचे खापर कल्याण बॅनर्जी भाजपवर फोडत आहेत.

    अभिषेक बॅनर्जींच्या बरोबरीने निवडणूकतज्ञ प्रशांत किशोर यांच्याबद्दलही तृणमूळच्या नेत्यांची नाराजी आहे. त्यांच्या मते किशोर यांची एन्ट्री पक्षा सल्लागार म्हणून न राहता डिसिजन मेकर म्हणून झाली आहे. नेमकी हीच बाब खटकते आहे. ममतांना हे सगळे प्रत्यक्ष अथवा सूचक पध्दतीने हे सांगून झाले आहे तरीही त्यांच्यात बदल होताना दिसला नाही म्हणून नेत्यांनी भाजपची वाट धरल्याचे दिसते.


    हे सगळे सरळपणे स्वीकारून पुढे जाता येईना म्हणून खासदार कल्याण बॅनर्जींना जाहीर करावे लागले की ममतांच्या कुटुंबातील कोणाला मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा नाही किंवा कोणी मुख्यमंत्री बनणारही नाही. त्याचवेळी ममतांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या अमित शहा, सुवेंदू अधिकारी यांच्यावर कल्याण बॅनर्जींनी पलटवार करून घेतला. बीसीसीआयचे पदाधिकारी जय शहा कोण आहेत, सुवेंदू आपल्या वारसांना राजकारणात पुढे आणत नाहीत का, असे सवाल कल्याण बॅनर्जी यांनी विचारले आहेत.

    mamatas party changed statuary

    पण तृणमूळला गळती लागल्याबरोबर ममतांच्या पक्षाच्या राजकीय स्ट्रॅटेजी बदलावी लागली हे उघड राजकीय गुपित आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…