वृत्तसंस्था
कोलकाता : भाजपापासून ओवैसींपर्यंत सगळ्यांना आक्रस्ताळे आव्हान देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसला भगदाड पडायला सुरवात झाली असून त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सुवेंदू अधिकारी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. भाजपने केलेली मोर्चेबांधणी आता ममतांना महागात पडायला सुरवात झाली आहे. ममतांनी एकाच वेळी भाजप आणि असदुद्दीन ओवैसी या दोन टोकाच्या पक्षांबरोबर पंगा घेतला आहे. त्याचे पडसाद राज्यात उमटायला सुरवात झाली आहे. Mamata decreases continues in Bengal
पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने ममतांच्या गोटात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोरात मोर्चबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीला अजून बराच अवकाश असला, तरी आतापासून राजकीय हादरे सुरू झाले आहेत. काही दिवसांपासून नाराज असलेले तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारी भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. आज आमदारकीचा राजीनामा देत अधिकारी यांनी खळबळ उडवून दिली आहे.
Mamata decreases continues in Bengal
ममतांनी भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख घेतानाच जलपैगुडीच्या रॅलीत ओवैसींनाही ललकारले. भाजपकडून पैसे घेऊन ओवैसी अल्पसंख्याकांची मते फोडत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर ओवैसीला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे, असा पलटवार ओवैसींनी करतानाच ममतांना स्वतःची तृणमूळ काँग्रेस संभाळण्याचा इशारा दिला होता.
अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधीपासूनच सुवेंदू अधिकारी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मंत्रिपदापाठोपाठ अधिकारी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिल्यानं, ते भाजपा जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुढील काही दिवसात अधिकारी भाजपात दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे भाजपाकडून पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अधिकारी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपानं त्याचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर त्यांना भाजपात येण्याचंही आवाहनही केलं आहे.
‘पाच खासदार भाजपाच्या वाटेवर’
काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार अर्जून सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे पाच खासदार भाजपात येणार असल्याचा दावा केला होता. सौगत रॉय यांच्यासह पाच खासदार तृणमूलचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटलें होते. त्यावेळी त्यांनी सुवेंदू अधिकारी यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.