पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून मनधरणी होत असली तरी परिवहन मंत्री सुवेंदू अधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत, असा असा दावा वरिष्ठ नेते मुकुल रॉय यांनी केला आहे.
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून मनधरणी होत असली तरी परिवहन मंत्री सुवेंदू अधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे, असा दावा वरिष्ठ नेते मुकुल रॉय यांनी केला आहे. mamata banerjee latest news
ममता बॅनर्जी यांच्या एककल्ली कारभाराला कंटाळून अधिकारी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पश्चिम बंगालमधील मिदनापूर आणि परिसरातील किमान ३० ते ४० मतदारसंघात अधिकारी यांचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे ममता बॅनर्जी हतबल झाल्या आहेत. अधिकारी यांची मनधरणी करत आहेत.
मात्र, याबाबत रॉय म्हणाले,अधिकारी यांची मनस्थिती द्विधा असली तरी भाजपात येणार आहेत. त्यांचा पश्चिम बंगालमध्ये मोठा प्रभाव असून, तेथील जनतेचीच सेवा करायची आहे. आपल्या पुढील राजकीय प्रवासाविषयी ते अद्याप काहीच बोलले नाही, पण लवकरच ते निर्णय घेतील. या नव्या प्रवासासाठी ते भाजपाचीच निवड करतील, यात काहीच शंका नाही.
तृणमूल कॉंग्रेसमध्ये फूट, ममता बॅनर्जींना मोठा धक्का
बंगालमध्ये आगामी सरकार भाजपाचेच राहणार आहे, याची माहिती अधिकारी यांनाही आहे. मागील दहा वर्षांच्या काळात ममता बॅनर्जी यांनी जो मनमानी कारभार केला, त्याला वैतागलेली जनता आता त्यांच्या तृणमूलला मतदान करणार नाही, याची जाणीवही त्यांना आहे. खर तर, अधिकारी यांना फार आधीच मंत्रिपद आणि पक्षाचा राजीनामा द्यायचा होता, असेही ते म्हणाले.
mamata banerjee latest news
अधिकारी यांनी पूर्व मिदनापूर जिल्ह्यात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. त्यानंतर ते पत्रपरिषदेला संबोधित करतील. याचवेळी ते आपल्या पुढील रणनीतीची घोषणाही करण्याची शक्यता आहे.