• Download App
    व्यक्तीमत्व विकासासाठी स्वतःमध्ये योग्य ते बदल करा|Make the right changes in yourself for personality development

    लाईफ स्किल्स : व्यक्तीमत्व विकासासाठी स्वतःमध्ये योग्य ते बदल करा

    प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व चांगले असावे असे वाटते. त्यात काही चूक नाही. पण व्यक्तीमत्व असेच चांगले बनत नसते. त्यासाठी कष्ट उपसावे लागतात. आपल्यात जर काही चूक होत असेल तर त्यात योग्य तो बदल करण्याची तसदी घ्यावी लागते. व्यक्तीमत्व घडविण्यासाठी पुढील काही टिप्स नक्की उपयोगी पडतील यात शंका नाही. अगोदर आपण स्वतः मध्ये बदल केला पाहिजे नंतर जगाकडून अपेक्षा ठेवली पाहिजे. एखाद्या छोट्याशा लालसेपोटी तुम्ही तुमच्या जीवनातील नियमांमध्ये तडजोड मुळीच करू नका.Make the right changes in yourself for personality development

    आपण नेहमी खरे बोलले पाहिजे कुठेही अजिबात खोटे बोलायचे नाही खास करून आपल्या स्वतःची अजिबात खोटे बोलायचे नाही. जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्ती सोबत बोलाल तेव्हा असा विचार करा की त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकून घ्यायचे आहे. त्याला असे काहीतरी माहित आहे ज्याचे ज्ञान आपल्याला घेणे गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीकडून असे शिक्षण घ्या ज्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते. आपण आपल्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्राविषयी देखील माहिती ठेवणे गरजेचे आहे आणि स्वतः बद्दल बोलताना नेहमी स्पष्ट भाषेचा वापर केला पाहिजे.

    आपण आपल्या प्रियजनांना जोखीम पासून दूर ठेवण्याऐवजी त्या जोखिमेचा सामना कसा करावा हे शिकविले पाहिजे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात जोखीम ही येणारच आहे तर त्यासाठी नेहमीच तयार असलेले योग्य असते. आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या सुखांचा देखील भरपूर आस्वाद घेतला पाहिजे आणि प्रत्येक क्षण सुखाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सची तुलना इतरांसोबत न करता तुमच्या कालच्या परफार्मन्स सोबत करा. ज्यामुळे तुमचे खच्चीकरण होणार नाही आणि तुमची प्रगती तुम्हाला किती झाली हे देखील कळेल.

    तुमच्या प्रियजनांना किंवा तुमच्या पाल्यांना चांगला नागरिक बनवण्याची जबाबदारी ही फक्त तुमची आहे समाजाची मुळीच नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या घरांमध्ये मुलांसाठी विशिष्ट नियम बनविणे गरजेचे आहे. या काही टिप्स अमलात आणल्यास व्यक्तिमत्व सुधारण्यास नक्कीच उपयोग होईल यात शंका नाही.

    Make the right changes in yourself for personality development

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!