विशेष प्रतिनिधी
बाहेर पाऊस पडू लागलाय. अशा या बरसणाऱ्या पावसात काही तरी झटपट बनणारा आणि पौष्टिक पदार्थ हवा ना? मग तुम्ही बनवा केरळच्या रस्त्यांवर मिळणारा हा थट्टू डोसा Make easy Kerala thattu Dosa at home
साहित्य:
१ वाटी तांदूळ
अर्धा वाटी उकडे तांदूळ
१ वाटी उडीद डाळ
चिमूटभर मेथीचे दाणे
२ चमचे उकडलेला भात
चवीनुसार मीठ
तळायला तेल
डोसाचे बॅटर कसे बनवाल:
- डाळ, मेथीचे दाणे, तांदूळ स्वच्छ धुवा, दहा तास पाण्यात भिजत ठेवा.
- डाळ आणि तांदूळ बारीक वाटून घ्या
- चवीनुसार मीठ टाकून उबदार ठिकाणी ठेवा
- डोसाचं पीठ रात्रभर ठेवल्यास फुगून वर येतं
टट्टु डोसा करण्याची कृती:
डोसा तवा गॅसवर गरम करत ठेवा , डोसा बॅटर चांगलं ढवळून घ्या, तवा तापला की त्याला थोडं तेल लावून पुसून घ्यावं, तवा नॉनस्टिक असेल तर तेल लावण्याची गरज नाही, तव्यावर थोडं पाणी शिंपडून तवा तापला का हे पाहावे, डावभर पीठ तव्यावर ओता आणि गोलाकार पसरावं, बाजूने तेल सोडा आणि झालेला डोसा सर्व्ह करा.,चटणी आणि सांबारसोबत हा डोसा मस्त लागतो.