• Download App
    Free Ayushman Bharat Card :आता मोफत बनवा आयुष्मान भारत कार्ड ;संकट काळात मोदी सरकारचा दिलासा;घ्या 5 लाखांपर्यंत लाभ;वाचा सविस्तर!Free Ayushman Bharat Card:Make Ayushman card free and get Rs 5 lakh for treatment, Modi government’s relief to the people

    Free Ayushman Bharat Card : आता मोफत बनवा आयुष्मान भारत कार्ड ;संकट काळात मोदी सरकारचा दिलासा;घ्या 5 लाखांपर्यंत लाभ;वाचा सविस्तर

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्लीः गरिबांना उपचारासाठी खर्च करण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना  (Ayushman Bharat Yojana) सुरू केली. ज्या अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना 5 लाखांपर्यंतची आर्थिक मदत मिळते. यासाठी त्यांना आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. हे कार्ड तयार करण्यासाठी आधी 30 रुपये शुल्क भरावे लागत.

     

     

    कोरोना काळात मोदी सरकारने यासंदर्भात जनतेला मोठा दिलासा दिलाय. आता कोणतीही व्यक्ती आयुष्मान भारत कार्ड पूर्णपणे विनामूल्य मिळवू शकते आणि उपचारासाठी आर्थिक लाभ घेऊ शकते.Free Ayushman Bharat Card:Make Ayushman card free and get Rs 5 lakh for treatment, Modi government’s relief to the people

    आयुष्मान कार्डचे फायदे

    आयुष्मान भारत योजनेंतर्गत कार्डधारकांना त्यांच्या आजारावर सरकारी रुग्णालयात सहज उपचार करता येतात.

    या माध्यमातून त्यांना उपचारासाठी विम्याचे पैसे मिळू शकतील. या कार्डच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी 5 लाख रुपये दिले जातात.

    कार्ड कसे तयार करावे?

    कार्ड बनविण्यासाठी आपण शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकता. एकदा नोंदणी झाल्यानंतर मोहिमेशी संबंधित कर्मचारी आपल्या घरी येतील आणि संपूर्ण तपशील घेतील. यानंतर तुम्हाला आयुष्मान कार्ड मिळेल. ते पीव्हीसीच्या स्वरूपात असेल. म्हणजेच ते एटीएम कार्डसारखे दिसेल, ते खराब होणार नाही. हे कार्ड विनामूल्य दिले जाईल.

     

    30 एप्रिलपर्यंत विनामूल्य बनवू शकता कार्ड

    आयुष्मान कार्ड विनामूल्य बनवण्यासाठी सरकारकडून एक विशेष मोहीम राबविली जाते. त्याअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. हे गोल्डन कार्ड म्हणून देखील ओळखले जाते. या कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय सुविधा मिळण्याची तरतूद आहे.

    Free Ayushman Bharat Card:Make Ayushman card free and get Rs 5 lakh for treatment, Modi government’s relief to the people

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य