• Download App
    महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षाचा तुरुंगवास; व्यावसायिकाला ६२ लाख रुपयांना फसविले Mahatma Gandhi's son-in-law sentenced to 7 years in prison

    महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षाचा तुरुंगवास; व्यावसायिकाला ६२ लाख रुपयांना फसविले

    वृत्तसंस्था

    डर्बन : दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पणतीला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली ७ वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आशिष लता रामगोबिन (वय ५६ ) यांना डरबनच्या न्यायालयाने ६० लाख रुपये फसवणुकीच्या आरोपात ७ वर्षाची शिक्षा सुनावली असून त्यांना कारागृहामध्ये पाठवलं आहे.
    व्यावसायिक असल्याचे सांगून आशिष लताने स्थानिक व्यावसायिकाकडून ६२ लाख रुपये हडपले. Mahatma-Gandhis-Great-Grandaughter-Sentenced-7-years-Jail: fraud In Africa

    पीडित एसआर महाराज यांनी सांगितले की, नफ्याचं आमिष दाखवून माझ्याकडून पैसे घेण्यात आले. एसआर महाराज यांनी आशिष लता यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. महाराजने लता यांना एक कन्साइमेंट इम्पोर्ट आणि कस्टम क्लिअर करण्यासाठी ६२ लाख रुपये दिले होते. परंतु अशाप्रकारे कोणतंही कन्साइमेंट नव्हतं. होणाऱ्या नफ्यातून काही वाटा एसआर महाराज यांना देऊ असं आमिष लताने दिलं होतं.

    लता रामगोबिन या प्रसिद्ध मानवाधिकार इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची मुलगी आहे. लता यांना डरबन विशेष व्यावसायिक गुन्हे न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर शिक्षेविरोधात अपील करण्यास परवानगी नाकारली आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीत सांगितले की, लता रामगोबिन यांची न्यू आफ्रिकेतील अलायंस फुटविअर डिस्ट्रीब्यूटर्सचे संचालक एसआर महाराज यांच्यासोबत ऑगस्ट २०१५ मध्ये भेट झाली होती.

    महाराज यांची कंपनी लिननचे कपडे आणि बूट आयात, उत्पादन आणि विक्री करते. त्यांची कंपनी इतर कंपन्यांना प्रोफिट शेअरच्या आधारे पैसे देते. लता रामगोबिन यांनी महाराज यांना सांगितले की, त्यांनी दक्षिण आफ्रीकी हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी लिननच्या कपड्यांचे ३ कंटेनर भारतातून आयात केले आहेत.

    फसवणुकीतून उकळले पैसे

    लता यांनी एसआर महाराज यांना आयात आणि सीमाशुल्क भरण्यासाठी पैसे कमी पडतायेत आणि बंदरावर सामान खाली करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे, असं सांगितले. या कामासाठी ६२ लाख रुपयांची गरज आहे. स्वत:चं म्हणणं सिद्ध करण्यासाठी लता रामगोबिन यांनी खरेदी केलेला करार आणि ऑर्डर पावती दाखवली. परंतु महाराज यांना अखेर समजलं की, लताने दाखवलेली सर्व कागदपत्रे बनावट आणि खोटी आहेत. त्याआधारे त्यांनी लता रामगोबिन यांच्याविरोधात खटला दाखल केला.

    Mahatma-Gandhis-Great-Grandaughter-Sentenced-7-years-Jail: fraud In Africa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    गणपतीच्या पहिल्या दिवशी झाली बंधूंची भेटीगाठी; पण फोटोला पोज देताना घातली हाताची घडी!!