महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. याविषयी आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. तसेच 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहे.Maharashtra lockdown New Strict Rules
विशेष प्रतिनिधी
मुंबई :राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत असताना लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच काळात राज्य सरकारने लॉकडाऊनची तयारी सुद्धा केली आहे. नवीन नियमानुसार आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून कडक निर्बंध लागू होणार आहेत. काय आहे ही नियमावली ?
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. यानुसार आज नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी
सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत.
सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये आता 15 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती
मंत्रालयातले कर्मचारी आणि केंद्र सरकारचे कर्मचारी यांची मुंबईतील कार्यालयं, इतर भागांमधली कार्यालयं या सगळ्यांनी नियम पाळणं आवश्यक
खासगी कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के उपस्थिती अपेक्षित आहे, बाकीच्यांनी वर्क फ्रॉम होम करावं
लग्न समारंभ
लग्न समारंभासाठी आता हॉलमध्ये फक्त दोन तासांसाठी जास्तीत जास्त 25 लोकांना उपस्थित राहता येईल. जर एकाही कुटुंबाने लग्न समारंभाचा हा नियम मोडला तर त्यांच्याकडून 50 हजारांचा दंड वसूल केला जाईल. लग्न समारंभाला हजर राहतानाही कोव्हिड 19 प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं आवश्यक
वाहतूक विषय नियमांमध्ये बदल
खासगी प्रवाशांना फक्त तातडीच्या कारणासाठी किंवा अत्यावश्यक गरजेसाठी प्रवास करता येईल. बसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या फक्त 50 टक्के प्रवाशांना मुभा.
प्रवाशाला त्याच्या मूळ गावी जायचं असेल तर त्यांना प्रवासाची मुभा आहे. मात्र अत्यावश्यक कारणासाठीच गावी जाता येईल. फिरण्यासाठी गावी जाण्याची किंवा इतर कुठे प्रवास करण्याची मुभा नाही
अंत्यविधी किंवा त्या कारणाइतकं तातडीचं कारण असेल तर प्रवास करण्याची मुभा आहे, आवश्यक सेवा किंवा तातडीचं कारण या शिवाय सर्व कारणांसाठी प्रवासावर निर्बंध आहेत जर या नियमांचं उल्लंघन केलं असेल तर 10 हजारांचा दंड घेतला जाईल
खासगी बसेसनाही त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी नेण्याची मुभा देण्यात आली आहे
सार्वजनिक प्रवासी वाहतूक
उपरोक्त कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांनाच लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनो या तिन्ही मार्गांनी प्रवासाची मुभा
सर्व सरकारी सेवेतील कर्मचारी(राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक सरकारी कर्मचारी). या सगळ्यांनाच तिकिट किंवा पास दिला जाईल. त्यासाठी सरकारी ओळखपत्र दाखवणं बंधनकारक असणार आहे.
वैद्यकीय सेवेत काम करणारे कर्मचारी, डॉक्टर्स, लॅब टेक्निशियन्स, हॉस्पिटल आणि मेडिलक क्लिनिक स्टाफ यांनाही आय कार्ड दाखवून तिकीट किंवा पास दिला जाईल त्यांनाच लोकल, मेट्रो किंवा मोनेने प्रवास करता येईल.
ज्या माणसाला वैद्यकीय उपचार घ्यायचे आहेत खास करून दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याला प्रवास करण्याची मुभा
बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही, खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने सुरू असतील
लोकल ट्रेन सामान्यांसाठी पूर्णतः बंद, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आय कार्ड सक्तीचं
किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे विक्री, अंडी,मटण, चिकन,मासे विक्री, कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने, पशूखाद्य विक्री, बेकरी व मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने तसेच, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने ही सर्व अत्यावश्यक दुकाने आणि विक्री ही सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहतील.
Maharashtra lockdown New Strict Rules