- चिपळूणमध्ये पुराचं पाणी ओसरलं, आता सर्वत्र घाण.संतापलेले स्थानिक आणि ठाकरे सरकारला खडे सवाल .
विशेष प्रतिनिधी
चिपळूण : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळूण दौर्यावर आहेत . पावसामुळे कोकणात मोठं नुकसान झालं. चिपळूण-महाड या भागात पावसामुळे पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरुन मोठं आर्थिक नुकसान झालं तर तळीये गावात भुस्खलनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पुराचं पाणी ओसरल्यानंतर आज चिपळूण दौऱ्यावर असलेल्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.स्थानिकांनी आदित्य ठाकरे यांना निरूत्तर केले .Maharashtra Flood: Just Environment Minister! What did you do when you came to power? Locals angry over Aditya Thackeray on Chiplun tour
तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलंत? कोकणात काय चाललंय हे पाहिलं आहे का? अशा शब्दांमध्ये स्थानिकांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या.
“इथली परिस्थिती काय आहे हे पहायला तुम्ही येत नाही. महिन्यातून एकदा तरी फेरी होते का तुमची? इथे आमच्या भागातला पूल वाहून गेला, गाळ अजुनही तसाच आहे. तो साफ करायची गरज आहे.” ज्यावर आदित्य ठाकरे शांतच दिसून आले .
पूरग्रस्तांना पंचनामे झाल्यानंतर भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन मात्र त्यांनी दिलं.
आदित्य ठाकरेंनी यावेळी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.. चिपळूण आणि महाड परिसरात आता पुराचं पाणी ओसरलेलं असलं तरीही आता सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. त्यामुळे मोडलेला हा संसार पुन्हा उभा करण्याचं आव्हान चिपळुणकरांसमोर आहे.
यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी ही वेळ राजकारण बाजूला ठेवण्याची आहे. आपण सर्वमिळून लोकांसाठी काही ना काही करतच आहोत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लोकांना सर्वतोपरीने मदत केली जाईल.
Maharashtra Flood: Just Environment Minister! What did you do when you came to power? Locals angry over Aditya Thackeray on Chiplun tour