Maharashtra economic survey: महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर ; कौटुंबिक हिंसाचारात महाराष्ट्रात वाढ – पती आणि नातेवाईकांकडून महिलांचा छळ
विशेष प्रतिनिधी
मुंबई: गुरूवारी जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणात
धक्कादायक बाब समोर आली आहे .कौटुंबिक हिंसाचारात महाराष्ट्रात वाढ झाली आहे.पती आणि नातेवाईकांकडून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये 2020 मध्ये घट झाल्यानंतर 2021 मध्ये वाढ झाली आहे.Maharashtra economic survey: Cases of cruelty against women ..by husbands relatives up in 2021
2020 मध्ये 6729 केस समोर आल्या होत्या तर 2019 मध्ये ही संख्या 8403 होती .2021मध्ये मात्र हा आकडा परत वाढला असून कौटुंबिक हिंसाचाराचे 8024 प्रकरणांची नोंद झाली आहे .
पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना अजूनही कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागत असून, गेल्या पाच वर्षांत तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात महिलांचा अधिक छळ होत असतानाच दुसरीकडे, कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढत आहे.