सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे! असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारला लगावले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे! असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारला लगावले आहे. maharashtra-chief-minister-uddhav-thackeray-latest-news
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकारने आणल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. maharashtra-chief-minister-uddhav-thackeray-latest-news
या मुद्द्यावरूनच भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ते म्हणाले, २ लाख ५० हजार नवे रोजगार आणि ६१ हजार कोटींची गुंतवणूक? हे रतन खत्रीचे आकडे सांगून काय उपयोग?
आधी हे सांगा की आत्महत्या करणाऱ्या शिक्षकांना पगार कधी देणार? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार? वीज बिलांचा झटका दिलात त्यांना दिलासा कधी देणार? बारा बलुतेदारांच्या मदतीचे काय झाले?
निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना मदत कधी मिळणार? उध्वस्त पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी पोहचणार? आरोग्य सेविका, कोविड योद्धे यांना मानधन कधी मिळणार? शाळांची फी कपात करुन पालकांना दिलासा कोण देणार, असे प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
maharashtra-chief-minister-uddhav-thackeray-latest-news
सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे, अशी कोपरखळी मारत शेलार यांनी ठाकरे यांच्या घोषणेतील पोकळपणा उघड केला आहे.