• Download App
    Mahabaleshwar flourished after 16 years 'Supushpa' plant; Efforts to survive

    ‘सुपुष्पा’ वनस्पतीच्या अस्तित्वासाठी प्रयत्न महाबळेश्वरला तब्बल १६ वर्षानंतर बहरली

    विशेष प्रतिनिधी

    सातारा – थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १६ वर्षानंतर फुलांचा बहर येवून नंतर मरून जाणारी कारवी वनस्पतीच्या प्रजातीतील वैविध्यपूर्ण आणि व अविस्मरणीय ‘सुपुष्पा’ महाबळेश्वरमध्ये बहरली आहे.

    तेथे तिचे परागीभवन व्यवस्थित होवून अस्तित्व कायम ठेवण्यासाठी वनविभागाने तेथील दोन पॉईंट पर्यटकांसाठी दहा दिवसांसाठी बंद ठेवले आहेत.
    सह्याद्रीच्या डोंगररांगात आढळणाऱ्या कारवीच्या अनेक प्रजाती प्रदेशनिष्ठ आणि अनोख्या सौंदर्याने जगभर प्रसिद्ध आहेत.

    यातील काही प्रजातींना विशिष्ठ वर्षानंतरच फुलांचा बहर येतो.ही एक अनोखी निसर्ग साखळी आहे.तब्बल १६ वर्षानंतर फुलांचा बहर येवून नंतर मरून जाणारी कारवी वनस्पतीच्या प्रजातीतील वैविध्यपूर्ण आणि व अविस्मरणीय सुपुष्पा (पिचकोडी) सध्या महाबळेश्वरमध्ये बहरली असून महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्यात त्यामुळे आणखी एका मनमोहक नजऱ्याची भर पडली आहे

    .कॅसल व सावित्री पॉइंटजवळ साधारणपणे आठवडाभरापासून सपुष्पाच्या बहराला सुरुवात झालेली आहे.आणखी १५ दिवस तरी बहर कायम राहील.त्यानंतर मात्र त्याचे रूपांतर बियांमध्ये होईल. १६ वर्षानंतर ही वनस्पती मरून जाते व त्याजागी बियांपासून नवीन वनस्पतीची निर्मिती होते.मात्र त्यासाठी सपुष्पाच्या फुलांचे परागीभवन होणे अत्यन्त महत्वाचे असते.

    सध्या त्या ठिकाणी मधमाशी, फुलपाखरे व इतर घटक आपापल्या परीने परागीभवन करताना दिसत असले तरी पर्यटकांची गर्दी व गोंगाट यामुळे परागीभवनात अडथळे येत असल्याने महाबळेश्वर वनपरिक्षेत्रमार्फत कॅसल व सावित्री हे दोन पॉईंट दहा दिवसांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर वनवृतचे उपजीविका तज्ञ डॉ.योगेश फोंडे यांनी सांगितले.ते म्हणाले,’जैव विविधता संवर्धनाचा भाग म्हणून राबविण्यात येणारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक डॉ.व्ही.क्लेमेंट बेन आणि साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

    दरम्यान मधमाशी,फुलपाखरे व अन्य किटकांमार्फत सुपुष्पा वनस्पतीच्या फुलांचे व्यवस्थित परागीकरण होण्यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालय कोल्हापूर येथील उपजीविका तज्ञ डॉ.योगेश फोंडे यांच्याकडून नियोजन करण्यात आले आहे.महाबळेश्वरचे परिक्षेत्र वनाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, वनपाल सहदेव भिसे,वनरक्षक लहू राऊत आणि संयुक्त वनव्यवस्थापन महासमिती महाबळेश्वर आदींचा मोहिमेत सहभाग आहे.

    – सुपुष्पा’ वनस्पतीच्या अस्तित्वासाठी प्रयत्न

    – तब्बल १६ वर्षानंतर बहरली

    – कॅसल व सावित्री हे दोन पॉईंट दहा दिवस बंद

    – परागीभवन होण्यासाठी घेतली काळजी

    Mahabaleshwar flourished after 16 years ‘Supushpa’ plant; Efforts to survive

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…