• Download App
    Marriage in flying plane : लॉकडाऊनमुळे विमानच बनलं मंगल कार्यालय, वधु-वरांनी आसमंतात बांधली रेशीमगाठ । Madurai Couple Marriage in flying plane Viral, Now DGCA de-rosters SpiceJet crew

    Marriage In Flying Plane : लॉकडाऊनमुळे विमानच बनलं मंगल कार्यालय, वधु-वरांनी आसमंतात बांधली रेशीमगाठ

    Marriage in flying plane : कोरोना काळात लग्न आणि त्यात लोकांच्या विचित्र पद्धती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण आता अख्खे लग्नच वेगळ्या पद्धतीने केले तर काय म्हणाल? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Madurai Couple Marriage in flying plane Viral, Now DGCA de-rosters SpiceJet crew


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना काळात लग्न आणि त्यात लोकांच्या विचित्र पद्धती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण आता अख्खे लग्नच वेगळ्या पद्धतीने केले तर काय म्हणाल? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊनसदृश परिस्थिती आहे. ठिकठिकाणी लग्नसमारंभासाठी कडक निर्बंध आहेत. पाहुण्यांची निश्चित संख्यासह कोरोना नियमावलीही पाळण्यास सांगितले जात आहे. परंतु या सर्वांना फाटा देत एका जोडप्याने लग्नासाठी अनोखी शक्कल शोधून काढली. त्यांनी लॉकडाऊनच्या विविध निर्बंधांना टाळण्यासाठी चक्क विमानातच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

    विमानात कोरोनाचा विसर, 161 वऱ्हाडींची हजेरी

    चर्चेतील हे जोडपे तामिळनाडूच्या मदुराई भागातील आहे. या जोडप्याने मदुराई-बंगळुरू विमान दोन तासांसाठी किरायाने घेतले. या विमानात त्यांचे 161 नातेवाईक स्वार झाले. विमानाने उड्डाण घेतले आणि जेव्हा मदुराईच्या प्रसिद्ध मीनाक्षी मंदिरावर आले तेव्हा त्यांनी लग्न केले. या जोडप्याने असा दावाही केला की, लग्नासाठी जेवढेही नातेवाईक विमानात आले होते त्यांची सर्वांची आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह होती. दरम्यान, तामिळनाडूमध्ये लॉकडाऊनमुळे लग्नासाठी 50 पेक्षा जास्त जणांना अनुमती नाही.

    सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत रमेश यांनी लिहिले की,मदुराईच्या राकेश आणि दक्षिणा यांनी एक विमान दोन तासांसाठी किरायाने घेतले आणि आकाशातच लग्न उरकले. लग्नानंतर कुटुंबीय पुन्हा स्पाइसजेटच्या विमानाने बंगळुरूहून मदुराईला रवाना झाले. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. काही लोक या व्हिडिओला पसंती देत आहेत, तर काहींनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याने टीकाही केली आहे.

    डीजीसीएचे स्पाइसजेटला ताकीद, क्रू डी-रोस्टर

    स्पाइसजेट विमानात एका जोडप्याने लग्न केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी कडक कारवाईचे आदेश दिले. डीजीसीएने म्हटले की, काल स्पाइसजेट विमानात मदुराईतील दांपत्याचे लग्न झाल्याच्या घटनेवरून डीजीसीएने स्पाइसजेटला संबंधित अधिकाऱ्यांना कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांनी म्हटले की, आम्ही या प्रकरणात आणखी माहिती घेत असून कडक कारवाई करण्यात येईल. त्या क्रूलाही डिरोस्टर करण्यात आले आहे.

    Madurai Couple Marriage in flying plane Viral, Now DGCA de-rosters SpiceJet crew

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार