प्रतिनिधी
नवी दिल्ली – इंधन दरांबरोबरच आता एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. विना-अनुदानित (नॉन-सब्सिडी) १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत गेल्या आठवड्यात पुन्हा तब्बल १५ रुपयांनी वाढ झाली.LPG gas pricses hiked
१ सप्टेंबरला १४.२ किलोच्या विना-अनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर २५ रुपयांनी वाढले होते. यापूर्वी तेल उत्पादक कंपन्यांनी १८ ऑगस्टला या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. दिल्लीचा विचार केला तर मागील एका वर्षात विना-अनुदानित सिलिंडरचे दर मागील एका वर्षात ३०५.५० रुपयांनी वाढले.
मुंबई-दिल्लीत विना-अनुदानित एलपीजी सिलिंडर आता ८९९.५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे; तर ५ किलोचा सिलिंडर यापुढे ५०२ रुपयांनी विकला जाईल. त्यामुळे ऐन सणासुदीत ग्राहकांचे महिन्याचे बजेट यापुढे पुन्हा एकदा कोलमडणार आहे.
नुकतेच एक ऑक्टोबरला १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरचे दरही वाढले होते. त्यानंतर आता विना-अनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर भडकले आहेत. यापूर्वीच्या दरांचा विचार केला तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार १४.२ किलो सिलिंडर दर वाढण्यापूर्वी दिल्लीत ८८४.५० रुपये, मुंबईत ८८४.५० रुपये, कोलकत्तामध्ये ९११ रुपये, तर चेन्नईमध्ये ९००.५० रुपये असे होते.
आता पुन्हा दरवाढ झाल्याने हे दर १५ रुपयांनी वाढतील. त्यानुसार दिल्लीत ८९९.५० रुपये, मुंबईत ८९९.५० रुपये, कोलकत्ता ९११ रुपये, चेन्नई ९१५.५० रुपये, पटना ९९८ रुपये अशी दरवाढ पाहायला मिळेल.
LPG gas pricses hiked
महत्त्वाच्या बातम्या
- Coal Shortage : कोळशाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रात वीज कमी पडू देणार नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ग्वाही, ग्राहकांना काटसरीने वीज वापराचे आवाहन
- Coal Crisis : केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “आम्ही राज्यांना कोळशाचा साठा वाढवण्यास सांगितले होते, पण त्यांनी तसे केलेच नाही!”
- हवाई प्रवासासंदर्भात मोठा निर्णय, देशांतर्गत उड्डाणांवरील निर्बंध हटवले, आता 100 टक्के प्रवासी क्षमतेला मुभा
- ठाकरे सरकारने २८०० कोटी रुपये थकीत ठेवले, कोळशाचं नियोजनच केलं नाही, म्हणूनच ही वेळ, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप
- आनंदाची बातमी : आता मुलांनाही मिळणार कोरोनाची लस, २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनला केंद्राची मंजुरी