वृत्तसंस्था
चंडीगड : हरियाणात देखील लव्ह जिहाद विरोधातील कायदा लागू होण्याच्या मार्गावर असताना हिंदू तरुणीशी विवाह करण्यासाठी एका मुस्लीम तरूणाने धर्मांतर केले आहे. या तरूणाने आपले नाव देखील बदलले आहे. या प्रकरणी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर या जोडप्याला हरियाणा पोलीसांनी संरक्षण दिले आहे. love jihad news
उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर हरियाणातही लव्ह जिहाद विरोधातील कायदा लागू करण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल विज यांनी मागील आठवड्यातच सांगितले होते. राज्य सरकारने या कायद्याचा मसूदा बनवण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. love jihad news
हिंदु तरूणीशी विवाह करण्यासाठी मुस्लिम तरूणाने धर्मांतर केल्याची घटना यमुनानगरची आहे. याबाबत यमुनानगरचे पोलीस अधीक्षक कमलदीप गोयल यांनी याबाबत सांगितले की, २१ वर्षीय तरूण आणि १९ वर्षीय तरूणीने ९ नोव्हेंबर रोजी हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला. तरूणाने धर्मांतर करून आपले नाव देखील बदलले आहे. विवाह केल्यानंतर या दाम्पत्याने उच्च न्यायालय गाठून सांगितलं की मुलीच्या कुटुंबापासून त्यांच्या जीवास आणि वैयक्तिक स्वातंत्र्यास धोका आहे. न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्या विवाहास विरोध करणे हे घटनेच्या कलम २१ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचे गंभीर उल्लंघन आहे, असे निरीक्षण नोंदविले.
love jihad news
यानंतर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दोघांनाही सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलिसांना त्यांना तेथील सुरक्षा गृहात पाठवले. जिथं ते अनेक दिवसांपासून थांबलेले आहेत. पोलीस अधीक्षकाने सांगितले की, पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांची देखील भेट घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. या अगोदर ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी दरम्यान जेव्हा मुलीच्या कुटुंबियांनी जेव्हा तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा तिने आपल्या कुटुंबीयांना भेटण्यास नकार दिला होता.