विशेष प्रतिनिधी
पुणे –नवीन प्रियकरासाेबत प्रेमसंबंध सुरु असताना जुना प्रियकर प्रेमात अडथळा ठरत असल्याने १९ वर्षीय प्रियेसी व तिच्या प्रियकराने जुन्या प्रियकरास निर्जन ठिकाणी बाेलवून घेत त्याच्या डाेक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण परिसरात घडला आहे. संजय पाटील (वय-४०) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
Love affairs old boyfriend murder by girl and his new boyfriend in chakan area
याबाबत प्रतिभा संजय पाटील (वय-२९, रा.चाकण,पुणे, मु.रा.पथराट,जि.जळगाव) यांनी चाकण पाेलीस ठाण्यात आराेपीं विराेधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पाेलीसांनी नेहा राेहिदास जाधव (वय-१९,रा. आंबेठाण,ता.खेड,पुणे) हिला अटक केली आहे. तिचा नवीन प्रियकर प्रेम उघडे व त्याचा भाऊ प्रतिक उघडे (रा.भांबाेली फाटा,पुणे) यांचेवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या नेहा जाधव आणि प्रेम उघडे यांचे प्रेमसंबंध नव्याने सुरु हाेते. परंतु त्यापूर्वी नेहा हिचे संजय पाटील यांचे साेबत प्रेमसंबंध हाेते. त्याचा अडथळा नवीन प्रेमसंबंधात येत असल्याने नेहा जाधव हिने प्रेम उघडे व प्रतिक उघडे यांच्याशी संगनमत करुन त्याचा खूनाचा कट रचला. त्याप्रमाणे संजय पाटील याला खेड तालुक्यातील भांबाेली गावाचे हद्दीतील इलाईट कंपनीचे जवळील माेकळे जागेत निर्जन स्थळी बाेलविण्यात आले. त्याठिकाणी ताे आल्यानंतर त्याचे डाेक्यावर दगड व लाेखंडी पाईपने जबर मारहाण करुन त्याचा निघृण खून केला. याबाबत म्हाळुंगे चाैकीचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक सारंग चव्हाण पुढील तपास करत आहे.
Love affairs old boyfriend murder by girl and his new boyfriend in chakan area
महत्त्वाच्या बातम्या
- नवीन शिक्षक भरतीसाठी दुसरी अभियाेग्यता व बुध्दिमत्ता चाचणी घेण्याची मागणी
- श्रीलंकेत अंतरिम सरकारची स्थापना होणार; पंतप्रधान महिंदा यांना हटवणार : राजपक्षे
- राजसभेची जोरदार तयारी : पवार – ठाकरे, गडकरी – पवार “राजकीय भेटीगाठी”…!!
- पबजी गेम खेळण्यासाठी मोबाईल हवा म्हणून केली चोरी
- Raj Thackeray : संभाजीनगरात शिवसेनेविरुद्ध तोफा धडाडणार म्हणून इम्तियाज जलील खुश; राजना इफ्तारचे निमंत्रण!!
- औरंगाबादच्या सभेस जाण्याकरिता राज ठाकरेंची जय्यत तयारी -दाैऱ्यावर जाण्यापूर्वी १०० ते १५० गुरुजी देणार शुभाशीर्वाद