• Download App
    तेलंगणमधील लॉकडाऊन पूर्णतः उठविला, देशातील पहिले राज्य ; जनतेने घेतला मोकळा श्वास Lockdown in Telangana completely lifted, The first state in the country; The people will get Relif

    तेलंगणमधील लॉकडाऊन पूर्णतः उठविला, देशातील पहिले राज्य ; जनतेने घेतला मोकळा श्वास

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : तेलंगण राज्यातील लॉकडाऊन पूर्णतः उठविला आहे, अशी घोषणा शनिवारी (ता. १९ ) करण्यात आली. त्यामुळे संपूर्णतः लॉकडाऊन मागे घेणारे तेलंगण हे राज्य देशातील पहिले ठरले आहे. Lockdown in Telangana completely lifted, The first state in the country; The people will get Relif

    कोरोनाची दुसरी लाट राज्यात ओसरत असल्यामुळे आणि कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता राज्य सरकारने राज्यातील लॉकडाऊन पूर्णतः उठविला आहे. लॉकडाऊनबाबत लागू केलेल्या अटी आणि नियम मागे घेतले जात आहेत, असे सरकारने आदेशात नमूद केले आहे.

    आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना संक्रमणातील घट आणि रुग्णांची कमी झालेली संख्या तसेच पॉझिटिव्हीटी रेटही बराच कमी झाला आहे, असा उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या फेसबुकवर केला आहे. दरम्यान, शुक्रवारी २४ तासात राज्यात १४१७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून १२ जणांचा मृत्यू झाला. आहे. शुक्रवारी १८९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १९ हजार २९ जणांवर उपचार सुरु आहेत.

    केंद्राचा राज्यांना इशारा

    राज्यातील लॉकडाऊन उठविताना आणि अनलॉक करताना राज्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. तसे करताना लसीकरणाकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे, अशी सूचना केली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी याबाबत राज्यांना पत्र लिहिले आहे. अनलॉक करताना विविध ठिकाणी गर्दी होणार नाही, अशी खबरदारी घ्यायला हवी, असे त्यांनी पात्रात नमूद केले आहे.

    Lockdown in Telangana completely lifted, The first state in the country; The people will get Relif

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…