• Download App
    LOCKDOWN EFFECT:दंगल करणारे हात शेतात राबतात !  लॉकडाउनमुळे  सांगलीची पैलवान संजना करतेय रोजंदारीवर काम LOCKDOWN EFFECT: Dangal hands work in the fields! Due to the lockdown, Sangli's wrestler Sanjana is working in the farm

    LOCKDOWN EFFECT:दंगल करणारे हात शेतात राबतात ! उदरनिर्वाहासाठी सांगलीची पैलवान संजना करतेय रोजंदारीवर काम

    तालीम बंद असल्यामुळे सराव सुटला, उदरनिर्वाहासाठी शेतात काम करतेय संजना .LOCKDOWN EFFECT: Dangal hands work in the fields! Due to the lockdown, Sangli’s wrestler Sanjana is working in the farm


    विशेष प्रतिनिधी 

    सांगली : कोरोना संसर्गाने अनेकजन बेरोजगार झाले आहेत . लॉकडाऊन, संचारबंदीची अनेकांना झळ बसत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून त्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. ज्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांना मिळेल ते काम करावं लागत आहे. या लॉकडाउनचा फटका खेळाडूंनाही बसलाय. मल्लांनाही तालिम सोडून द्यावी लागल्याने त्या ओस पडल्या आहेत.खेलो इंडिया स्पर्धेत आश्वासक कामगिरी करुन पदकांची लयलूट करणारी सांगलीची पैलवान संजना बागडी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु रहावा यासाठी रोजंदारीवर काम करतेय.LOCKDOWN EFFECT: Dangal hands work in the fields! Due to the lockdown, Sangli’s wrestler Sanjana is working in the farm

    दोन वर्षे कुस्ती मैदान नाही की यात्रा नाहीत, त्यामुळे खुराकाला पैसा आणायचा कोठून? असा प्रश्‍न पडला आहे. सांगलीतील तुंग येथील अनेक पदकांसह राष्ट्रीय खेलो इंडिया  पदक विजेती संजना बागडी यांनही याची झळ बसत आहे. ३०० रूपयाच्या रोजंदारीवर कामासाठी इतरांच्या बांधावर जावे लागत आहे.⁶

    सांगली जिल्ह्यातल्या तुंग येथील १२ वी मध्ये शिकणारी पैलवान संजना बागडी ही देखील सध्या कुटुंबासोबत शेतात रोजंदारीवर शेतमजुर म्हणून काम करते आहे. संजनाचं कुटुंब हे मच्छिमारीचा व्यवसाय करुन पोट भरतं. परंतू लॉकडाउन काळात बाजारपेठ बंद असल्यामुळे सध्या ३०० रुपये रोजंदारीवर काम करावं लागलंतय. जे हात तालमीतल्या मातीत असणं गरजेचं आहे त्या हातांना लॉकडाउनमुळे शेतात काम करावं लागतंय.

    संजना सांगलीत उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवते. आतापर्यंत संजनाने अनेक राज्यस्तरीय, शासकीय, शालेय, भारतीय कुस्ती महासंघ, खेलो इंडिया अशा स्पर्धांमध्ये पदकाची कमाई केली आहे.

    ही व्यथा एकट्या संजनाची नाहीये. तिच्यासारख्या अनेक मल्लांना सध्या लॉकडाउनच्या काळात अशाच पद्धतीने काम करावी लागत आहेत. त्यामुळे सरकारने या मल्लांकडे लक्ष देऊन लॉकडाउनचे नियम शिथील करावेत अशी मागणी  होते आहे.

    LOCKDOWN EFFECT: Dangal hands work in the fields! Due to the lockdown, Sangli’s wrestler Sanjana is working in the farm

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!