• Download App
    LOCKDOWN AGAIN : महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार का?काय म्हणाले अजित पवार? LOCKDOWN AGAIN: Will there be night lockdown across the country including Maharashtra? What did Ajit Pawar say?

    LOCKDOWN AGAIN : महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार का?काय म्हणाले अजित पवार?

    देशात ओमायक्रॉनचे रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत, त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे 


    ओमिक्रॉनमुळे संकट गहिरं होऊ शकतं. त्यामुळे देशपातळीवर रात्रीचा लॉकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसापासून चांगलंच तापलं आहे.
    राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस . या अधिवेशनात काही सदस्य विनामास्क फिरताना दिसत आहेत. या वरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.LOCKDOWN AGAIN: Will there be night lockdown across the country including Maharashtra? What did Ajit Pawar say?

     

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा ठरला .सभागृहात मास्क न घालून येणाऱ्या सदस्यांवर अजित पवार चांगलेच संतापले. लॉकडाऊनबाबतही महत्त्वाचं भाष्य अजित पवारांनी केलं आहे.

    काय म्हणाले अजितदादा?

    ‘कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. ओमिक्रॉन या व्हायरस व्हेरिएंटचा धोका आहेच. अजून एक कुणीतरी त्याचा भाऊ असलेला विषाणूही आलाय म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाच्या व्हायरस व्हेरिएंची गंभीर दखल घेतली आहे. वेळ पडली तर राज्यसह देशभर रात्रीचा लॉकडाऊन लावण्यासंबंधीचा विचार सुरू आहे.’ असं महत्त्वाचं वक्तव्य अजितदादांनी आज सभागृहात केलं आहे.

    अनेक आमचे सदस्य, विरोधी पक्षातले लोक सगळ्यांना मी इथे पाहतोय. अनेकजण मास्क लावतच नाहीत. आपल्या सगळ्या गोष्टी, व्हीडिओ, ऑडिओ बाहेर जातात. चॅनलला प्रक्षेपण केलं जातं. कितीही कुणीही प्रयत्न केला तरीही संकट गेलेलं नाही.

    कोरोनाचा व्हेरिएंट समोर असताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. अनेकांना मास्क लावून बोलताना अडचण वाटते. मग किमान बोलून झाल्यावर तरी मास्क लावा. सभागृहात मास्क न लावता येणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांना काय सांगत आहोत? बाहेरच्या देशांमध्ये दीड दिवसाला दुप्पट रूग्ण वाढत आहेत तशी परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    एवढंच नाही तर ज्यांनी मास्क लावला नसेल त्यांना बाहेर काढा. उद्या मी जरी मास्क न लावता आलो तर मलाही बाहेर काढा असंही अजित पवार म्हणाले.

     

    अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर सभापती नरहरी झिरवळ यांनी सगळ्यांना तातडीने मास्क लावण्याच्या सूचना दिल्या. तसंच बोलताना अडचण येत असल्यास मास्क काढा मात्र बोलून झाल्यानंतर मास्क लावा असंही सांगितलं आहे.

     

    LOCKDOWN AGAIN: Will there be night lockdown across the country including Maharashtra? What did Ajit Pawar say?

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!