आपल्याकडे होणारा ज्ञानाचा साठा वाचनापेक्षा श्रवणानेच अधिक जमा झालेला असतो. पण ज्ञान साठवण्याचे हे कौशल्य विकसित करणे फार महत्त्वाचे असते हे कोणाला समजत नाही. आपण विविध प्रकारच्या बोधकथा ऐकत असतो. पण आपण अशा अनेक गोष्टी ऐकतो आणि सोडून देतो. पण त्या एकाग्र चित्ताने ऐकल्या तर त्या कथांचे मोल कळते. अन्यथा आपण ती कथा ऐकण्यात घालवलेला वेळ व्यर्थ गेलेला असतो. आपण ती गोष्ट ऐकताना आपला वेळ तर दिलेला असतो; पण तो वेळ सत्कारणी लागलेला नसतो. Life Skills: You accumulate more knowledge by listening, so listen with a concentrated mind.
गोष्ट ऐकण्यात वेळ घालवणे आणि तीच गोष्ट ऐकताना एकाग्र होऊन वेळ घालवणे या दोन्ही प्रकारात वेळ तर गेलेला असतोच, पण दुसऱ्या प्रकारात एकाग्र झाल्याने वेळेचा सदुपयोग होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे एक सूत्र आपल्याला गवसलेले असते. एकाग्र होऊन गोष्ट ऐकण्यात वेळ खर्ची घालणे म्हणजेच क्रिटिकल लिसनिंग. दोन्ही प्रकारात लिसनिंग आहेच पण दुसऱ्या प्रकारचे लिसनिंग हे एकाग्रतेमुळे क्रिटिकल झाले आहे. ते क्रिटिकल आहे म्हणूनच एकाग्र चित्ताने गोष्ट ऐकणे हे उपयुक्त ठरले आहे. तेव्हा व्यक्तिमत्त्व विकासात श्रवण कौशल्याला महत्त्व असते. आपल्याला आपल्या शाळेत लिहायला आणि वाचायला शिकवले जाते. म्हणजेच लिखाणाचे आणि वाचनाचे कौशल्य शिकवले जाते पण श्रवणाचे कौशल्य शिकवले जात नाही.
खरेतर आपण वाचनातून जसे ज्ञान प्राप्त करीत असतो, तसेच श्रवणातूनही प्राप्त करीत असतो. किंबहुना आपल्याकडे होणारा ज्ञानाचा साठा वाचनापेक्षा श्रवणानेच अधिक जमा झालेला असतो. पण ज्ञान साठवण्याचे हे कौशल्य विकसित करणे फार महत्त्वाचे असते हे कोणाला समजत नाही. आपण वाचन किंवा श्रवणच करीत आहोत पण दुसऱ्या प्रकारात एकाग्रता मिसळलेली आहे. किंबहुना या एकाग्रते मुळेच दुसरे श्रवण हे उपयुक्त ठरले आहे. म्हणजेच कोणतीही गोष्ट वाचताना किंवा ऐकताना एकाग्रतेने वाचावी किंवा लिहावी हे व्यक्तिमत्त्व विकासाचे इंगित आहे. जे एकाग्रतेने ऐकतात ते काही तरी बोध घेतात पण जे एकाग्रतेने ऐकत नाहीत ते गोष्ट ऐकून कोरडेच राहतात.