Thursday, 1 May 2025
  • Download App
    लाईफ स्किल्स : इतरांना कॉपी करण्यात वेळ घालवू नका, स्वतःमधील गुण ओळखा | The Focus India

    लाईफ स्किल्स : इतरांना कॉपी करण्यात वेळ घालवू नका, स्वतःमधील गुण ओळखा

    अनेकांना एखाद्या सेलिब्रेटी अथवा प्रभावी व्यक्तिमत्वाला कॉपी करण्याची सवय असते. मात्र इतरांसारखं वागण्याने तुमचं व्यक्तिमत्व बदलत नाही. यासाठीच इतरांची स्टाईल कॅरी करण्यापेक्षा तुमची स्वतःची वेगळी स्टाईल कॅरी करा. ज्यामुळे तुमचे प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकेल. त्यासाठी तुमच्याकडे कोणते गुण आहेत तसेच कोणते अवगुण आहेत याची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. Life Skills: Don’t spend time copying others, recognize your own strengths

    या गुणांची एकदा शांतपणे बसून यादी करा. गुणांना चांगल्या प्रकारे जोपासा तर एकेक अवगुण कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न करा. यातून आपल्या स्वतःच्या व्यक्तीमत्वाला चांगल्या प्रकारे आकार येवू लागतो हे नेहमी लक्षात ठेवा. व्यक्तिमत्व विकासाबाबत मनात असेलेल्या प्रश्नांची योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. करिअरमध्ये अथवा जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशेष गुण तुमच्यामध्ये असावे लागतात. हे गुण तुमच्या व्यक्तिमत्वात अधिकच भर पाडतात.

    माणसाच्या सर्वांगिण विकासासाठी या गोष्टी महत्ताच्या आहेत. यांनाच कौशल्य असं म्हणतात. ती सतत विकसित करत पुढे जा. कोणत्या कौशल्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो याचा नेहमी विचार करा.नेतृत्वगुण, संवादकौशल्य, निर्णयक्षमता, समजूतदारपणा, सहानुभूती, आत्मविश्वास, समस्या निराकरण गुण, सर्जनशीलता, ताणतणावाचे नियोजन ही सर्व कौशल्ये तुमच्यामध्ये असतील तर तुमच्या व्यक्तिमत्वात भर पडते. संवाद कौशल्य बऱ्याचदा मुलांना पालकांकडून मिळत असतं. पण जर तुमच्यामध्ये जन्मजात संवादकौशल्य नसेल तर ते तुम्ही नंतरही विकसित करू शकता. वाचन, श्रवण आणि आत्मविश्वासातून तुम्ही स्वतःमधील संवादकौशल्य वाढवू शकता. ज्यामुळे नक्कीच तुमचं एक प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकतं.
    असे म्हटले जाते की तुम्ही कितीही ओरडून आणि किंचाळून बोलला तरी तुमचे म्हणणे इतरांपर्यंत पोहचणार नाही. कारण असं बोलणं कुणीच मनापासून ऐकत नाही. त्यापेक्षा तुमचं मत शांतपणे आणि धीटपणे मांडा ज्याचा इतरांच्या मनावर नक्कीच चांगला परिणाम होईल.

    Life Skills: Don’t spend time copying others, recognize your own strengths

    Related posts

    मोदी तिकडे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवायच्या बेतात; पवार इकडे दहशतवाद्यांच्या धर्मांधतेच्या चिखलात!!

    RSS chief Mohan Bhagwat प्रचंड राजकीय धकाधकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मोदींच्या भेटीला; दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा, पण नेमके गूढ काय??

    PM Modi : पाकिस्तानात घुसून मारताना भारतीय सैन्य दलांमध्ये आता राजकीय हस्तक्षेप नाही, पण तो केव्हा आणि कुणी केला होता??