• Download App
    डाव्या पक्षांकडून शेतकरी आंदोलन हायजॅक | The Focus India

    डाव्या पक्षांकडून शेतकरी आंदोलन हायजॅक

    शेतकरी आंदोलनाला डाव्या विचारांच्या संघटना आणि डाव्या राजकीय पक्षांनीच हायजॅक केकल्याचा आरोप केला जात आहे. शेतकºयांना भडकाविण्याचा प्रयत्न डाव्या पक्षांकडून केला जात आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: दिल्ली-पंजाब आणि दिल्ली-हरयाणा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला डाव्या विचारांच्या संघटना आणि डाव्या राजकीय पक्षांनीच हायजॅक केकल्याचा आरोप केला जात आहे. शेतकºयांना भडकाविण्याचा प्रयत्न डाव्या पक्षांकडून केला जात आहे. left parties hijacked Farmer movement

    दिल्लीजवळ बाबा बंदासिंह बहादूर नगर येथे १० डिसेंबर रोजी एक कार्यक्रम झाला. एकता उगराहा या डाव्या विचारांच्या गटाने हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमात डाव्या विचारांच्या अटकेत असलेल्या व्यक्तींच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक पोस्टर झळकावण्यात आले होते. पोस्टरवर अटकेत असलेल्या निवडक डाव्या विचारांच्या लोकांचे फोटो होते. पोस्टरसह स्टेजवर सुरू असलेल्या कार्यक्रमाचे फोटो शेतकºयांनी सोशल मीडियावर व्हायरल केले गेले.

    या फोटोंमुळे शेतकरी आंदोलन डाव्यांनी हायजॅक केल्याची चर्चा जोर धरत आहे. फक्त कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करुन शेतकरी आंदोलन करत आहेत, असे शेतकºयांचे नेते सांगत आहेत. पण फोटोंमध्ये डाव्या राजकीय विचारांचे नेते सोडून द्यावे यासाठी झळकावलेले पोस्टर वारंवार दिसत आहे. शेतकºयाचा आंदोलनात हा राजकीय मुद्दा कसा उपस्थित झाला असा सवाल करण्यात येत आहे.



    मानवाधिकार फक्त डाव्यांपुरतेच मयार्दीत आहेत का, असा प्रश्नही विचारला जात आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तिथे कॅप्टन अमरिंदर यांच्या सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणाºयांना मुदत संपली तरी राज्य सरकारने जेलमधून सोडलेले नाही. या मंडळींच्या मानवाधिकारांचे काय, असाही प्रश्न विचारला जात आहे.

    left parties hijacked Farmer movement

    शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी लागलेल्या पोस्टरमध्ये काही महाराष्ट्राशी संबंधित फोटो होते. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेले गौतम नवलाखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव यांच्यासह काही जणांच्या सुटकेची मागणी होत आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रातील हिंसक कारवायांमध्ये हात असल्याचा आरोप आहे. अशा आरोपी असलेल्या डाव्या विचारांच्या नेत्यांचे फोटो शेतकरी आंदोलनात ठेवण्यामागचा नेमका हेतू काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??