विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक काळा अध्याय जालियनवाला बाग हत्याकांड… या हत्याकांडाच्या स्मृतीस्थळाचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या उपस्थितीत जालियनवाला बागेत चार नवीन स्मृती गॅलरी आणि स्मृतिस्थळाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन करण्यात आले आहे. Left historians prof Chaman lal and Irfan Habib targeted Modi government over jallianwala baugh memorial renovation
मात्र स्मृती स्थळाचे हे नूतनीकरण डाव्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या इतिहासकारांना खटकले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रो. चमन लाल आणि कम्युनिस्ट इतिहासकार इरफान हबीब यांनी जालियनवाला बाग स्मृतिस्थळाच्या नूतनीकरणवरून मोदी सरकारवर टीका केली आहे.
जालियनवाला बागेत 1000 भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. जुलमी ब्रिटिश अधिकारी मायकेल ओ डायर याने पोलिसांना आदेश देऊन केलेल्या गोळीबारात शेकडो भारतीयांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्या भारतीयांचे हे स्मृतीस्थळ आहे. तेथे गेल्यावर भारत यांना आदर वाटला पाहिजे. त्याच्या स्मृतींनी गदगदून आले पाहिजे.
परंतु सरकारने जालियनवाला बागेच्या इतिहासाला चमजदार (glamorized) बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तेथे उद्यान बांधून लोकांच्या करमणुकीचे साधन बनवले आहे, अशी टीका प्रो. चमनलाल यांनी केली, तर सरकार हे इतिहासाला तोडून मरोडून पेश केले आहे, असे टीकास्त्र इरफान हबीब यांनी सोडले आहे. इतिहासाचे उदात्तीकरण करणे गैर आहे. जो इतिहास घडला तो तसाच मांडला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
देशातील डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट इतिहासकारांनी राष्ट्रवादाचा इतिहास नेहमीच नाकारला आहे. जालियनवाला बागेचे स्मृती स्थळाचे नूतनीकरण झाल्याने डाव्यांच्या इतिहासाच्या narrative ला धक्का बसला आहे. त्यामुळेच प्रो. चमन लाल आणि इरफान हबीब यांना जालियानवाला बाग स्मृतिस्थळाच्या नूतनीकरण खटकले आहे.
Left historians prof Chaman lal and Irfan Habib targeted Modi government over jallianwala baugh memorial renovation
महत्त्वाच्या बातम्या
- कॅगने केले ममता सरकारचे कौतुक, म्हटले – ‘लॉकडाऊन असूनही, जमाखर्चाचा ताळेबंद १०० % जुळला
- Tokyo Paralympics सिंहराज अधानाने नेमबाजीत जिंकले कांस्य, भारताच्या खात्यात आता आठ पदके
- Stock Market : शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरूच, सेन्सेक्सने प्रथमच ओलांडला ५७००० अंकांचा टप्पा, निफ्टी १७ हजारांच्या जवळ
- KBC 13 : कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाल्याने रेल्वे अधिकाऱ्यावर कारवाई, 3 वर्षांसाठी वेतनवाढीवर बंदी
- 70 वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयात एकाच वेळी 9 न्यायाधीशांचा शपथविधी, कोरोना प्रोटोकॉलमुळे विशेष कार्यक्रम