केंद्र सरकार प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहे. कुमार विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे चर्चेत आहेत. कुमार विश्वास यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कवी कुमार विश्वास यांना केंद्र सरकार लवकरच सुरक्षा पुरवू शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर कुमार विश्वास यांनी खळबळजनक आरोप केला होता. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मी पंजाबचा मुख्यमंत्री किंवा खलिस्तानचा पंतप्रधान बनेल असा दावा केला होता. यावरून वाद निर्माण झाला असून कुमार विश्वास यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. यामुळेच गृह मंत्रालय आता कुमार विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा घेत आहे.KUMAR VS KEJRIWAL: Kumar Vishwas’ security will be enhanced! Central government alert after Kejriwal’s statement
या संपूर्ण प्रकरणात खलिस्तानचा उल्लेख असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळेच कुमार विश्वास यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात असून गरज पडल्यास ती वाढवली जाऊ शकते.
दिल्लीचे मुख्यमंत्री व ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे सत्ता मिळविण्यासाठी फुटीरवाद्यांचीही मदत घेऊ शकतात, ते काहीही करू शकतात, असा गंभीर आरोप प्रसिद्ध कवी व आम आदमी पार्टीचे माजी नेते कुमार विश्वास यांनी केला.
फुटीरतावाद्यांपासून दूर राहा, त्यांची मदत घेऊ नका, असे केजरीवालांना मागच्याच निवडणुकीत सांगितले होते, असे कुमार विश्वास यांनी सांगितले. त्यावर केजरीवाल म्हणाले होते की, तुम्ही काळजी करू नका. एक तर मी एका राज्याचा मुख्यमंत्री होईल किंवा एका स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राचा पंतप्रधान होईल. केजरीवाल यांना केवळ सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी ते काहीही करू शकतात असा आरोप कुमार विश्वास यांनी केला.
हा व्हिडिओ शेअर करताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
दुसरीकडे, आम आदमी पक्षाने कुमार विश्वास यांच्यावर जोरदार प्रहार करत ते आतापर्यंत गप्प का होते, असे म्हटले आहे.
KUMAR VS KEJRIWAL: Kumar Vishwas’ security will be enhanced! Central government alert after Kejriwal’s statement