मुंबई : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात देशभरात सर्वांत कमी मतदान झाले. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे नीचाकांचे रेकॉर्ड कायम राहिले. पुरोगामी महाराष्ट्र पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मतदानामध्ये देखील शेवटच्या स्थानावर होता.Kolhapurkar tops first class in voting percentage; First from last in Baramatikar Second Class!!; What exactly does it mean??
पण तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानात कोल्हापूरकरांनी फर्स्ट क्लास मध्ये टॉपर होऊन बाजी मारली. त्यांच्या पाठोपाठ हातकणंगलेकरांनी नंबर लावला. पण संपूर्ण महाराष्ट्रासह देशात मराठी माध्यमांनी आणि इतर माध्यमांनी अतिप्रतिष्ठेच्या केलेल्या बारामती मतदारसंघात मात्र आतापर्यंतचे सर्वात नीचांकी मतदान झाले. पवार काका पुतण्यांनी पायाला भिंगरी लावून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. कधी नव्हे ते पवारांनी बारामती मतदारसंघात पैसे वाटल्याचे आरोप झाले. पण एवढे करूनही पवार काका पुतणे मतदारांना बाहेर पडून मतदान करण्यासाठी 50 % देखील प्रोत्साहन देऊ शकले नाहीत. बारामतीत पहिल्यांदाच 47.68 % एवढे नीचांकी आणखी मतदान झाले.
पवार काका विरुद्ध पुतण्या, नणंद विरुद्ध भावजय ही लढाई बारामतीकरांनी मतदान नाकारून लोकसभेपुरती तरी थांबवली. पण मतदानाच्या नीचांकी टक्केवारीमुळे बारामतीकरांनी पवार नावाचा ब्रँडच नाकारल्याचा दाट संशय अत्यंत वरिष्ठ राजकीय वर्तुळात वाढला.
त्या उलट कोल्हापूरकरांनी महाराष्ट्रात टॉप वर राहून मतदान केले. त्यामुळे याचा फायदा शाहू महाराजांना होणार की संजय मंडलिक यांना होणार??, याच्या मोठमोठ्या पैजा कोल्हापूरकरांमध्ये लागल्या. कोल्हापुरात शाहू महाराजांच्या बाजूने उभी राहिलेली महाविकास आघाडीची एकजूट कामी आली की संजय मंडलिकांसारख्या पठ्ठ्याने हिरीरीने मैदानात उतरून शिवसेना + भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण यंत्रणा वापरून आपल्या बाजूने मतदान वळवून घेतले??, यासह कोल्हापूरमध्ये “मान देऊन गादीला, मत देऊ मोदीला” ही घोषणा किती चालली??, याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली आहे.
त्या पाठोपाठ हातकणंगले मतदारसंघात फर्स्ट क्लासच मतदान झाले. सुशील कुमार शिंदे यांच्या हाय प्रोफाईल सोलापूर मध्ये देखील मतदारांनी अल्प प्रतिसाद दिला. बाकी सगळे मतदार संघ सेकंड क्लास मध्ये पास झाले.
सातारा लोकसभा मतदारसंघातही सेकंड क्लास एवढे मतदान झाले. पण यंदा तिथे पाऊस पडला नसल्याने आणि शरद पवारांना मूळातच उमेदवार देताना तिथे दमछाक झाल्याने प्रत्यक्ष झालेल्या मतदानातून उदयनराजे किती लीड घेऊ शकतात??, याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
माढातल्या मतदानाच्या टक्केवारीने अनेकांचे डोके भिरभिरले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या ताकदीच्या बळावर आणि स्वतः खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या हिमतीवर माढा मतदारसंघ त्यांनी आपल्या बाजूने फिरवून घेतला की पवारांनी टाकलेल्या कथित डावाच्या आधारे मोहिते पाटलांच्या उमेदवारीचा प्रभाव अकलूज – माळशिरस सोडून इतरत्र देखील पडला??, याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. पण मतदानाची तिथली टक्केवारी पवारांचा देखील फारसा उत्साह वाढवणारी दिसली नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात किरण सामंत “नॉट रिचेबल” झाल्याच्या बातम्या सकाळी फिरल्या. पण जणू काही किरण सामंत हेच नारायण राणेंच्या मतदारसंघात निवडणूक “फिरवणारे” शक्तिमान नेते आहेत, असा आभास माध्यमांनी निर्माण केला. प्रत्यक्षात रत्नागिरी सिंधुदुर्गतली मतदानाची टक्केवारी इतरांच्या तुलनेत समाधानकारक राहिली. नारायण राणेंनी राबविलेल्या यंत्रणेचा त्यांना लाभ होईल की उद्धव ठाकरेंनी मोदी विरोधी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केल्याने असल्याने चित्र फिरेल??, याविषयी दाट शंका आहे.
भाजपने संपूर्ण देशभरात क्लस्टर यंत्रणा राबवली होती. त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपचे कार्यकर्ते पूर्णपणे ऍक्टिव्ह मोडमध्ये होते, मग हा ऍक्टिव्ह मोड भाजपच्या कामाला आला की मूळातच कमी टक्केवारीने बाहेर पडलेला मतदार हा थेट भाजपच्या विरोधातलाच होता??, याचे उत्तर मतदान यंत्रात बंद झाले आहे.
तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात किती झालं मतदान?
1. लातूर – ५५.३८ %
2. सांगली – ५२.५६ %
3. बारामती – ४७.८४ %
4. हातकणंगले – ६२.१८ %
5. कोल्हापूर – ६३.७१ %
6. माढा – ५०.०० %
7. उस्मानाबाद – ५६.८४ %
8. रायगड – ५०.३१ %
9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – ५४.७५ %
10. सातारा – ५४.७४ %
11. सोलापूर – ४९.१७ %
Kolhapurkar tops first class in voting percentage; First from last in Baramatikar Second Class!!; What exactly does it mean??
महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांच्या डोळ्यातून अश्रुधारा, अश्रू सुकले सुप्रियांच्या डोळा, अजितदादांच्या भाषणातून बरसल्या नक्कलेच्या धारा!!
- 10 मतदारसंघांमधला प्रचाराचा ताण, घसाही बसला; प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द!!
- पुतिन पाचव्यांदा घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ ; म्हणाले, ‘रशियाचे नेतृत्व करणे पवित्र कर्तव्य’
- अबकारी धोरण प्रकरणः न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत केली वाढ.