Pushkar Singh Dhami Profile : उत्तराखंडमधील राजकीय घडामोडींनंतर अखेर पुष्करसिंह धामी यांना शनिवारी नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले. तीरथसिंह रावत यांनी राजीनामा दिल्याने सर्वांची नजर राज्याच्या नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे होती. भाजप विधिमंडळ गटाने बैठक घेऊन पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे पुष्कर सिंह धामी यांच्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. Know Pushkar Singh Dhami Profile Became New CM Of Uttarakhand
विशेष प्रतिनिधी
डेहराडून : उत्तराखंडमधील राजकीय घडामोडींनंतर अखेर पुष्करसिंह धामी यांना शनिवारी नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले. तीरथसिंह रावत यांनी राजीनामा दिल्याने सर्वांची नजर राज्याच्या नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे होती. भाजप विधिमंडळ गटाने बैठक घेऊन पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे पुष्कर सिंह धामी यांच्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी तीन-चार नावे सातत्याने चर्चेत राहिली, पण सर्व अंदाज खोटे ठरवत भाजप पक्षश्रेष्ठी व आमदारांनी पुष्करसिंह धामींवर विश्वास व्यक्त केला. खाटिमा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार असलेल्या धामी हे राज्यातील तरुण चेहरा आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अगदी जवळचे मानले जातात.
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही होते
राज्याचे नवे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे उत्तराखंडमधील भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्षही राहिलेले आहेत. 2002 ते 2008 या काळात त्यांनी हे पद भूषविले. धामी यांना तीन बहिणीही आहेत. त्यांचे वडील भारतीय सैन्यात होते. धामींचा जन्म पिथौरागडच्या तुंडी या गावी झाला. मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंधात त्यांनी पीजी आणि एलएलबी शिक्षण पूर्ण केले आहे.
खाटिमातून सलग दोन वेळा आमदार
पुष्करसिंह धामी यांनी उत्तराखंडच्या खाटिमा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळविला. ते 2012 ते 2017 पर्यंत आमदार होते आणि त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. धामी सांगतात की, 1990 ते 1999 पर्यंत त्यांनी जिल्हा ते राष्ट्रीय स्तरापर्यंतच्या एबीव्हीपीमध्ये विविध पदांवर काम केले. सहा वर्षे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी जागोजागी प्रवास केला आणि बेरोजगार तरुणांना संघटित करण्याचे काम केले.
राज्यपाल कोश्यारींचे शिष्य
पुष्करसिंह धामी हे राजनाथ सिंह यांचे समर्थक मानले जातात आणि महत्त्वाचे म्हणजे सध्याचे महाराष्ट्राचे बहुचर्चित राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांचे पुष्करसिंह धामी हे विशेष कार्यकारी अधिकारी अर्थात OSD होते. याचा अर्थ त्यांचा प्रशासनातल्या बारकाव्यांचा चांगला अभ्यास आहे. याचा उपयोग त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रशासन चालवताना निश्चित होणार आहे.
सर्वांना मागे टाकून मुख्यमंत्रिपदी धामी
उत्तराखंडला नवीन मुख्यमंत्री मिळण्याची चर्चा सुरू झाली तेव्हापासून मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बरीच नावे पुढे होती. पुष्करसिंह धामी यांनी ही सर्व नावे मागे टाकली. तीरथसिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर या शर्यतीत सतपाल महाराज, त्रिवेंद्रसिंह रावत, धनसिंह रावत यांच्यासह अनेक नावे होती. परंतु, नवे मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पुष्कर धामी यांची निवड झाली, तेव्हा सर्व चकित झाले होते.
Know Pushkar Singh Dhami Profile Became New CM Of Uttarakhand
महत्त्वाच्या बातम्या
- ED raids : धर्मांतराशी संबंधित PMLA प्रकरणी दिल्ली आणि यूपीच्या 6 जागांवर छापेमारी, गत महिन्यात दाखल केला होता गुन्हा
- ED raids : धर्मांतराशी संबंधित PMLA प्रकरणी दिल्ली आणि यूपीच्या 6 जागांवर छापेमारी, गत महिन्यात दाखल केला होता गुन्हा
- Jagannath Yatra : का काढली जाते भगवान जगन्नाथांची रथयात्रा, आख्यायिका काय सांगतात? जाणून घ्या वैशिष्ट्य!
- तक्रारी अधिकारी नियुक्त करण्याच्या अंतिम टप्प्यात ट्विटर, दिल्ली हायकोर्टाला दिली माहिती
- सॅटेलाइट इमेजवरून ड्रॅगनच्या कुरापती उघड, चीनमध्ये आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाइलसाठी 100 हून जास्त नव्या सायलोंची निर्मिती