Kisan Credit Card Loan : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक वर्षात 6,000 रुपये टाकते. योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता लवकरच हस्तांतरित केला जाणार आहे. पीएम किसानचा हा नववा हप्ता 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना मिळेल. Know Process About pm kisan Yojana Kisan Credit Card Loan can take up to 3 lakhs at affordable rates
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक वर्षात 6,000 रुपये टाकते. योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता लवकरच हस्तांतरित केला जाणार आहे. पीएम किसानचा हा नववा हप्ता 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांना मिळेल.
पीएम किसानचे लाभार्थी शेतकरी स्वस्त दरात उपलब्ध कर्जाचा लाभ घेऊ शकतात. स्वावलंबी भारत योजनेअंतर्गत सरकार पीएम किसान लाभार्थींना किसान क्रेडिट कार्डची (Kisan Credit Card Loan) सुविधा पुरवत आहे. शेतकरी परवडणाऱ्या दराने केसीसीकडून 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
यांना मिळू शकते स्वस्त कर्ज
शेती, मत्स्यव्यवसाय आणि पशुपालनाशी संबंधित कोणीही किसान क्रेडिट कार्डचा (Kisan Credit Card Loan) लाभ घेऊ शकतो. तथापि, पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी फक्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असेल. ही केसीसी सुविधा एसबीआय, पीएनबी, एचडीएफसीसह सर्व प्रमुख बँकांद्वारे मिळू शकते.
काय आहे व्याज दर?
केसीसी कर्जावरील (Kisan Credit Card Loan) व्याज दर 9 टक्के आहे, परंतु शेतकऱ्यांना खूप कमी व्याज द्यावे लागते. सरकार केसीसीवर 2 टक्के सबसिडी देते. यासह शेतकऱ्याला या कर्जावर 7 टक्के व्याज दराने कर्ज मिळते. जर शेतकऱ्यांनी हे कर्ज वेळेपूर्वी भरले तर त्यांना व्याजावर 3 टक्केपर्यंत सूटदेखील मिळते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या कर्जावरील एकूण व्याजाच्या फक्त 4 टक्के रक्कम भरावी लागते. किसान क्रेडिट कार्डची वैधता 5 वर्षे आहे.
कोणती कागदपत्रे गरजेची?
किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card Loan) मिळवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आपला फोटो आवश्यक असेल. यासह तुम्हाला एक प्रतिज्ञापत्रदेखील द्यावे लागेल, ज्यात तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही.
अशी आहे प्रक्रिया
सर्वप्रथम, किसान क्रेडिट कार्डाचे फॉर्म पीएम किसान योजनेच्या वेबसाइट, PMkisan.gov.in वरून डाउनलोड करावे लागतील. यानंतर फॉर्म भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या बँक शाखेत जमा करावा लागेल.
Know Process About pm kisan Yojana Kisan Credit Card Loan can take up to 3 lakhs at affordable rates
महत्त्वाच्या बातम्या
- Afghanistan : आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकला तालिबान, गुरुद्वारातून काढलेले निशाण साहिब पुन्हा स्थापित
- मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती, 58 रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले, 20 कोरोना रुग्णांचाही समावेश
- आनंदाची बातमी : महाराष्ट्रात पहिला कोरोनामुक्त जिल्हा बनला भंडारा, रुग्णालयातून अखेरच्या कोरोना रुग्णालाही डिस्चार्ज
- आता भारतात मिळणार सिंगल डोस कोरोना लस, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपत्कालीन वापराची मंजुरी
- Raj Kundra Case : शर्लिन चोप्राचा खुलासा, राज कुंद्रा म्हणाला होता की, शिल्पाला माझे व्हिडिओ आवडतात !