केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीत पुढील आठ पायऱ्या सांगितल्या आहेत.
१) ऑक्सिमीटर मध्ये बोट घालण्यापूर्वी नेल पॉलीश, कृत्रिम नखे लावली असल्यास काढून टाकावीत. हात एकमेंकांवर चोळून उबदार करावेत.
२) ऑक्सिजन तपासण्यापूर्वी पाच मिनिटे विश्रांती घ्या
३) तुमचा हात छातीवर ह्रदयाच्या जवळ ठेवा. काही वेळ तसाच ठेवा
४) ऑक्सिमीटर चालू करून मधले बोट किंवा करंगळी त्यामध्ये घाला
५) ऑक्सिमीटरवरील रिडींगचा आकडा कदाचित कमीजास्त होऊ शकतो. तो स्थिर होईपर्यंत वाट पाहा. आकडा स्थिर होत नसेल तर ऑक्सिमीटर किमान एक मिनीट स्थिर ठेवा
६) ऑक्सिमीटरवरील सर्वात जास्त रिडींग किमान पाच सेकंद स्थिर राहीपर्यंत बोट त्यामध्ये ठेवा.
७) प्रत्येक रिडींग हे काळजीपूर्वक नोंदवून ठेवा.
८) दिवसातून किमान तीन वेळा ऑक्सिजन लेव्हल तपासा.
ऑक्सिजन लेव्हल घरीच वाढविण्यासाठी चार-पाच उशा चेहऱ्याखाली घेऊन पालथे झोपून राहण्याचा सल्लाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीत दिला आहे.