वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम : केरळात कोरोना मृतांच्या कुटुंबांना दरमहा ५००० रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री पी विजयन सरकारने घोषणा केली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना हा लाभ मिळणार आहे.Kerala will provide assistance of Rs 5000 every month To the families of the Corona dead
‘कोविड १९ मुळे मृत्युमुखी पडलेल्या आश्रित दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत मिळेल. आश्रितांना समाज कल्याण, कल्याण कोष किंवा इतर पेन्शन उपलब्ध होण्यासाठी अपात्र ठरवलं जाणार नाही.
व्यक्तीचा मृत्यू हा राज्यात किंवा राज्याबाहेर किंवा देशाबाहेर झाला असेल तरी राज्याच्या रहिवाशांना हा लाभ मिळेल’, असं यात म्हटलं गेले आहे.
‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ अंतर्गत पुढची तीन वर्ष प्रत्येक महिन्याला ५००० रुपये थेट आश्रितांच्या खात्यात पोहचवली जाईल. योजनेसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद केली जातो नाही तोवर मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीतून ही आर्थिक मदत दिली जाईल.
Kerala will provide assistance of Rs 5000 every month To the families of the Corona dead
महत्त्वाच्या बातम्या
- फेसबुकची ‘सीक्रेट ब्लॅकलिस्ट’ लीक, भारतातील ‘या’ 10 धोकादायक संस्था आणि लोकांची नावेही समाविष्ट
- Cruise Drugs Case : आर्यन खान 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामिनावरील निकाल राखून ठेवला
- बांग्लादेशात दुर्गापूजा मंडपात कट्टरतावाद्यांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना, अफवांमुळे उसळला हिंसाचार
- नवाब मलिक म्हणाले, हे लोक तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाहीत, NCB ने जावयाच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय गाठले